उत्तरप्रदेशात महिला पोलीस अधिकाऱ्यावर क्राइम ब्रँच पोलीस निरीक्षकाचा बलात्कार

rape-on-police-officer

अलीगढ – उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील एका पोलीस निरीक्षकाने महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडितेने यासंबंधी आरोप केले आहेत. आरोपी पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, महिला पोलीस अधिकाऱ्याने आरोप केल्यानंतर पोलीस निरीक्षकाला शुक्रवारी निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. महिला अधिकाऱ्याच्या मुलीच्या सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा छळ केल्याच्या प्रकरणाचा तपास या पोलीस निरीक्षकाकडे होता. सांसी गेट पोलीस ठाण्यात यासंबंधी २०१८मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

 

२९ ऑक्टोबरला पोलीस निरीक्षकाने या प्रकरणासंबंधी काही कागदपत्रे देण्यास पीडितेला सांगितले. त्याचवेळी त्याने पोलीस ठाण्यात तिला बोलावण्याऐवजी एका हॉटेलात बोलावून घेतले. तिथे गेल्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. याबाबत कुठे वाच्यता केली तर, परिणाम भोगावे लागतील, असे तिला धमकावले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिला अधिकाऱ्याने भीतीमुळे याबाबत कुणालाही काही सांगितले नाही. मात्र, वारंवार तो धमक्या देत असल्याने अखेर तिने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी पोलीस निरीक्षक फरार झाला. त्याचा शोध घेण्यात येत आहे. शुक्रवारी त्याला निलंबित करण्यात आले असून, या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here