सोलापूर येथे भरधाव टेम्पो चालकाने वाहतूक पोलिसाला चिरडले

solapur-trafic-police

सोलापूर – येथील सोलापूर-पुणे महामार्गावर महामार्ग पोलिसाला आयशर टेम्पो चालकाने धडक दिली. या अपघातात सागर औदुंबर चौबे (वय-35, रा. बार्शी, नियुक्त मोडनिंब महामार्ग पोलीस पॉईंट) यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

 

 

हा अपघात रविवारी दुपारी 4 ते 4.30 दरम्यान वरवडे टोल नाक्याजवळ झाला. अपघातानंतर टेम्पो चालकाला पकडण्यात आले आहे. टेम्भुर्णी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

 

बार्शी येथील दोघे भाऊ ग्रामीण पोलीस दलात भरती झाले होते. मृत सागर चौबे यांचा भाऊ विशाल चौबे हे सावळेश्वर महामार्ग पोलीस पॉईंटवर नियुक्त आहे. दरम्यान, या घटनेनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here