मुंबई (चित्रपटविभाग प्रतिनिधी गणेश तळेकर) – हिंदी मालिकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय मालिका गेली कित्येक वर्षे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ चाहत्यांना हसवत आहे त्या मालिकेच्या लेखकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
लेखक अभिषेक मकवाना यांनी मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. अभिषेकच्या आत्महत्येने या कार्यक्रमाच्या सर्व टिमला जबरदस्त झटका बसला आहे.
२७ नोव्हेंबरला अभिषेक यांचा मृतदेह मुंबईतील फ्लॅटमध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. त्यांनी लिहिलेल्या सुसाइड नोट मध्ये आर्थिक अडचणीमुळे आपण ही आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या भावाने जेनीस सांगितले की, अभिषेकच्या मृत्यूनंतर त्याला आर्थिक अडचण असल्याची माहिती समोर आली. त्यांनी अभिषेकचे फोन उचलणे सुरु केले तेव्हा त्यांना या घटनेबाबत कळाले.
जेनिसने सांगितले की, “मी अभिषेकचे मेल चेक केले. कारण जेव्हा त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांच्या फोनवर वेगवेगळ्या नंबरवरून अनेक कॉल्स आले होते. ज्यावर लोकांनी अभिषेकने पैसे परत न दिल्याचे सांगण्यात येत आहे. यात एक कॉल बांग्लादेशचा होता तर एक म्यानमारचा. याशिवाय अन्य राज्यांतूनही त्याला कॉल्स आले होते.” असेही त्याच्या भावाने सांगितले. अभिषेक मकवाना यांनी आत्महत्या केल्याच्या वृत्ताने टीव्ही इंडस्ट्रीत पुन्हा एकदा हळहळ व्यक्त होतं आहे. त्यांनी आत्महत्या का केली याचं नेमकं कारण पत्रात नमूद केलेलं नाही.







