मीराभाईंदर परिसरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भंडाफोड

uttan-police

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – उत्तन परिसरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. उत्तन परीसरातील धावकी या ठिकाणी बंगल्यात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती परिमंडळ-१ उपायुक्त अमित काळे यांना मिळाली. येथे विशेष पथकाला पाठवून छापा टाकण्यात आला आहे. यामध्ये दोन महिला दलालांसह चार पीडित मुलींना ताब्यात घेण्यात आले आहे. येथे हायप्रोफाईल सेक्स रॅकेट असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

 

मीरा-भाईंदर शहरात गोरख धंद्यांवर जोरदार कारवाई सुरू आहे. शहरातील गुटखा माफिया, जुगाराचे अड्डे, स्पा पार्लर, अनैतिक कामांवर पोलिसांनी अनेक ठिकाणी कारवाई केल्या आहेत. उत्तन परिसरातील धावकी या ठिकाणी एका बंगल्यात उच्चभ्रू (हायप्रोफाईल) वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांना खबऱ्यांमार्फत मिळाली. उपायुक्त अमित काळे यांनी संपूर्ण माहिती घेऊन पथक तयार केले आणि सोमवारी दुपारी सापळा रचून छापा टाकला. घटनास्थळी सहा महिला आढळून आल्या. सदर कारवाईत नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे उपस्थित होते.

 

 

सदर प्रकरणात चार पीडित मुलींमध्ये दोन मुली मॉडेल असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये दोन महिला दलालांसह चार पीडित मुलींना अटक करण्यात आली असून दलाल महिलांवर ‘पिटा’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चार पीडित मुलींना सुधारगृहात पाठवणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here