स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यावर जीवघेणा हल्ला

ravikant-tupkar

बुलडाणा – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यावर काल (दि.०९) जीवघेणा हल्ला करण्यात आला. एका अज्ञाताने कुऱ्हाडीच्या साहाय्याने तुपकर यांच्यावर हल्ला केला. या घटनेत ते बचावले आहेत परंतु त्यांचा स्विय सहाय्यक गंभीर जखमी झाला असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी हल्लेखोर जनार्धन दगडू गाडेकर यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडल्याचे समजते आहे.

 

रविकांत तुपकर तालुक्यांच्या दौऱ्यांवर होतो ते सायंकाळी बुलडाण्यात परतले. ते चिखली रोडवर असलेल्या कार्यालयात बसले होते. दरम्यान ते पाहुण्यांना सोडण्यासाठी बाहेर आले असता एक अज्ञात व्यक्ती त्यांच्या वाहनाचा नंबर लिहत होता. यावेळी रविकांत तुपकर यांच्या स्वीय सहाय्यक सौरभ पडघान यांनी संबंधिताला जाण्यास सांगीतले. यावेळी रविकांत तुपकर यांच्यावर गाडेकर नावाच्या व्यक्तीने कुऱ्हाडीने वार करण्याचा प्रयत्न केला.

 

हा वार त्यांचे अंगरक्षक गणेश चाटे यांनी रोखला. मात्र दुसरा वार गाडेकर यांनी केला असता कुऱ्हाड उलट्या बाजूने तुपकर यांचे स्विय सहाय्यक सौरभ पडघान यांच्या छातीत लागल्याने ते जखमी झाले. त्यानंतर तेथे गोंधळ झाला. या घटनेत सुदैवाने रविकांत तुपकर थोडक्यात बचावले. सौरभ पडघान यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

 

दरम्यान या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी आरोपी जनार्धन दगडू गाडेकर यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील कुऱ्हाड व अन्य हत्यारही ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना कळताच पोलिस ठाण्यात मोठ्या संख्येने स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here