ओबीसी नेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भाजप व नारीशक्ती तर्फे कपडे वाटप

bjp-faizpur

यावल (तालुका प्रतिनिधी डॉ मोहन साळुंके) – भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री व ओबीसी नेते स्व.गोपिनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त फैजपूर येथे भारतीय जनता पार्टी व खान्देश नारीशक्ती गृप तर्फे लहान बालकांना कपडे तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. भाजपा कार्यकर्त्या व खान्देश नारीशक्ती गृप अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांच्या हस्ते झोपडपट्टी परीसरातील लहान बालकांना नवे कपडे व खाऊचे वाटप करण्यात आले.

 

स्व.गोपिनाथ मुंडे साहेब यांच्या सारख्या ज्येष्ठ ओबीसी नेत्यांनी भाजप चे विचार ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहचवून पक्षाची बहुजनांचा पक्ष अशी ओळख निर्माण करण्यात मोलाचा वाटा होता असे प्रतिपादन नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी यांनी केले.स्व.गोपिनाथ मुंडे यांच्यासारख्या नेत्यांच्या प्रयत्नांमुळेच आज भाजपा पक्ष हा ओबीसींना जवळचा पक्ष वाटतो असे मत भाजप शहर सरचिटणीस संजय भावसार यांनी व्यक्त केले.

 

झोपडीत राहणाऱ्या बालकांना कपडे तसेच खाऊचे वाटप करुन गरीबांच्या झोपडीत आनंद निर्माण करणे हीच मुंडे साहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल असं भाजप आदिवासी आघाडी शहराध्यक्ष रशीद बाबू तडवी यांनी यावेळी सांगितले.यावेळी भाजपा शहर सरचिटणीस संजय भावसार, भाजप आदिवासी आघाडी शहराध्यक्ष रशीद बाबू तडवी, देवेंद्र झोपे सर, जन संघाचे संदिप पाटील,पार्थ झोपे,सौ.योगिनी विसावे मॅडम,सौ.सिमा कोल्हे मॅडम इ.उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here