राममंदिरासोबतच वाल्मिकी मंदिर व्हावे या व अन्य मागण्यांसाठी आदिवासी टोकरे कोळी समाजाचे निवेदन

Anil-gote

दोंडाईचा – धुळे (संतोष कोळी) – येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या 12 डिसेंबर रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रमाप्रसंगी, तोंडाच्या येथे माजी आमदार तथा ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष, हे दोंडाईचा ला दौऱ्यावर आले होते.

 

या प्रसंगी उपस्थित डॉक्टर रवींद्र देशमुख यांच्या साक्षीने आदिवासी टोकरे कोळी समाजाला जातीचे प्रमाणपत्र ,तीन पिढीपेक्षा जास्ती ने पुरावे मागू नये, अयोध्या नगरी येथील प्रभू श्री रामचंद्र जी यांचे मंदिर उभारण्यात येत आहे ,त्या ठिकाणी रामायणाचे ,शिल्पकार कोळी समाजाचे आराध्य दैवत आद्यकवी महर्षी वाल्मिक ऋषी यांचे मंदिर उभारण्यात यावे, टोकरे कोळी समाजातील जात प्रमाणपत्र पडताळणी करिता जास्तीचे पुरावे मागू नये अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अनिल अण्णा गोटे , यांच्याकडे अखिल भारतीय कोळी, कोरी समाजाचे धुळे जिल्हाध्यक्ष संतोष कोळी पत्रकार, माजी नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यावतीने मुख्यमंत्री व प्रशासन आदिवासी टोकरे कोळी समाजाच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.

 

दोंडाईचा येथील आलेल्या दौरा प्रसंगी, अखिल भारतीय युवा कोळी कोरी समाजाचे धुळे जिल्हा अध्यक्ष ,संतोष कोळी पत्रकार यांनी बैठकीत, माजी आमदार अनिल अण्णासाहेब गोटे यांच्याकडे मागणी केली ,कोळी समाजातील बांधवांना एसटी चे प्रमाणपत्र मिळण्याबाबत, शासनाकडे पाठपुरावा करण्याबाबत विनंती केली , रामायण रचीयेतेकर महर्षी वाल्मिक ऋषी यांचेदेखील मंदिर उभारण्यात यावे त्यासाठी देखील शासन स्तरावर पाठपुरावा करावा या आशयाचे निवेदन देण्यात आले .

 

याप्रसंगी दोंडाईचा येथील माजी नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र देशमुख दोंडाईचा नपाचे माजी नगराध्यक्ष गुलाब सोनवणे, माझी नगरसेवक दिलीप पाटील ,माजी नगरसेवक भूपेंद्र धनगर ,माजी शिक्षण सभापती नाजिम शेख तसेच माजी शिक्षण सभापती महेंद्र पाटील ,माजी नगरसेवक गिरधारीलाल राम राख्या, अखिल भारतीय युवा कोळी कोरी समाजाचे धुळे जिल्हा अध्यक्ष पत्रकार संतोष कोळी,समाजाचे प्रा सुरेश कुंवर सर ,वसंत कोळी,विशाल कोळी, विजय कोळी इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत वरील निवेदन देण्यात आले

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here