नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि कुबेर जाधव) – नामपूर येथील कृषी उप्पन बाजार समितीच्या आवारात शनिवार दि 12 रोजी सकाळी 9 वाजता शेतकऱ्याचे पंचप्राण कै शरद जोशी ची पाचवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली .
सुरवातीला उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते कै जोशींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . बाजार समितीचे सभापती संजय भामरे , खेमराज कोर ,संचालक दीपक पगार ,भाऊसाहेब अहिरे ,कृष्णा भामरे ,प्रवीण अंबासनकर यांनी शरद जोशींच्या कार्य कर्तृत्वाबद्दल मनोगत व्यक्त केले , यावेळी टेहरे येथील आंदोलनाचे साक्षीदार आनंदपूर येथील शेतकरी विठ्ठल गमन भामरे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .
या प्रसंगी आपल्या प्रमुख भाषणातून शरद जोशी विचार मंचचे अध्यक्ष कार्यक्रमाचे आयोजक खेमराज कोर यांनी जोशींचा पुतळा बसवण्याची मागणी बाजार समितीकडे केली .यावर पिंगळवाडे येथील संचालक कृष्णा भामरे यांनी कोणाकडूनही लोकवर्गणी न करता .बाजार समितीत स्वखर्चाने पुतळा उभारणार असंल्याची घोषणा केली .यावेळी बाजार समितीच्या वतीने सर्वानुमते अनुमोदन देण्यात आले .
आगामी एका वर्षाच्या आत हे काम पूर्ण होणार असल्यामुळे बागलाण तालुक्यातील शेतकरी बांधवात समाधान व्यक्त केले जात आहे . या पुण्यतिथी सोहळ्यास संजय भामरे , खेमराज कोर , हेमंत कोर , अशोक सावंत , हेमंत ठाकरे , अशोक ठाकरे ,आनंदा मोरे , प्रमोद पगार .भाऊसाहेब भामरे , बी एस ठाकरे , ग्यानदेव कोर , विलास सावंत , दीपक सावंत , विजय सावंत , भास्कर सावंत ,डोंगर पगार ,केदाजी पगार .प्रवीण सावंत भूषण काकडे , सह बाजार समितीचे कर्मचारी व परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात हजर होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विनोद पाटील यांनी मानले आभार शरद जोशी विचार मंचचे संस्थापक खेमराज कोर यांनी मानले .







