मुंबईत एनसीबीकडून 6 किलो चरस जप्त, तीन जणांना ताब्यात

mumbai-charas

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – अमली पदार्थ तस्करीच्या संदर्भात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून मुंबईत मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून तीन जणांना अटक करण्यात आलेली आहे. या आरोपींच्या ताब्यातून तब्बल सहा किलो चरस हस्तगत करण्यात आले आहे.

 

 

एनसीबीकडून एलटीटी रेल्वे स्थानकावर 6 किलो 600 ग्रॅम चरस जप्त करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणी आफताब शेख (28), सबीर सय्यद(30) आणि शमीम कुरेशी या आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी हे कुर्ला परिसरातील रहिवाशी असून त्यांनी आणलेले चरस हे काश्मीरवरून आणले होते. या संदर्भात एनसीबीकडून अधिक तपास केला जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here