टाडा कायदयाअंतर्गत गुन्हयातील २८ वर्षापासून पाहीजे असलेला आरोपीतास ठाणे गुन्हे शाखा,घटक-१ने केले गजाआड

thane-crime

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – नौपाडा पोलीस स्टेशन, गुन्हा रजि.नं. २६३/११९२,टाडा कलम ३(३)(३) व ५ सह भा. द.वि.स. कलम १२०(ब), १४७,१४८, ३८५, ३८७,५०६(२),५०४, २०१ सह भा.ह.का.कलम २५(१)(अ) या गुन्हयातील फिर्यादी श्री. अरुण गोविंद मुदलीयार यांना दिनांक १०/०४/१९९२ ते ०६/१०/१९९२ च्या दरम्यान गण्या सांवत दादा व त्याचे इतर साथीदार अटक व पाहिजे असलेले आरोपीयांनी आपसात संगनमत करून गुन्हेगारी कट कारस्थान रचून फिर्यादी यांना महानगर पालिकेकडून मिळालेली पाचपाखाडी सर्वे नं. ३२६ मधील मोकळी जागा फिर्यादी यांनी आरोपी नं.१ गणेश सावंत यास खाली करून दयावी किंवा त्याचे मोबदल्यात १ लाख ८० हजार रूपये खंडणी दयावी या करीता आरोपीत यांनी रिव्हॉल्वर,चाकू, चॉपर या सारख्या प्राणघातक शस्त्रासह येवून व त्याचा धाक दाखवुन, दहशत निमार्ण करून शिवीगाळी व दामदाटी करून फिर्यादी व त्यांचे कुटूबियांना स्वत:चे आर्थिक फायदयासाठी जिवे ठार मारण्याची धमकी दिली. म्हणून वरील प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

 

सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे सिताराम उर्फ बबन सुखदेव खोसे, वय-६६ वर्ष, दर्या पाडळी, ता.-पारनेर,जिल्हा- अहमदनगर याचा मा. वरिष्ठांचे सुचना प्रमाणे समांतर तपास चालु असताना गुन्हे शाखा,घटक-१ चे पोलीस हवालदार रविंद्र काटकर यांना बातमीदारा मार्फत नमुद पाहिजे आरोपी हा त्याचे गावी अहमदनगर येथे आपले अस्तित्व लपून रहात असल्याची माहिती मिळाल्याने सपोनिरी/काकड व पथक असे अहमदनगर येथे जावून, स्थानिक पोलीसांची मदत घेवुन व त्याचा शोध घेवुन आज रोजी त्यास ताब्यात घेतले. त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस करता त्याने आपला गुन्हयात सहभाग असल्याची माहिती दिली. त्याचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने पुढील तजविज कामी नौपाडा पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास नौपाडा पोलीस स्टेशन हे करीत आहे.

 

सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त श्री.विवेक फणसळकर, पोलीस सह आयक्त डॉ.सुरेश कुमार मेकला मा. अप्पर पोलीस आयुक्त, (गुन्हे ) श्री. संजय ऐनपुरे, मा.पोलीस उप आयक्त, (गुन्हे) श्री. लक्ष्मीकांत पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे (शोध-१) श्री. किसन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-१, ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे.पोलीस निरीक्षक/कृष्णा कोकणी, सहा.पो.निरी/ योगेश काकड,पोहवा/रविंद्र काटकर, आनंदा भिलार प्रकाश कदम.भरत आरवंदेकर,पोना/संजय बाबर, चापोशि/ भगवान हिवरे या पोलीस पथकाने केली आहे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here