नेहरू युवा केंद्र अंतर्गत वडगाव येथे महात्मा गांधी ग्रामस्वच्छता अभियान…!

neharu-yuva-kendra

रावेर (प्रतिनिधी हमीद तडवी) – भारत सरकारच्या युवा कार्यक्रम क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र जळगाव व नेहरू युवा केंद्र संलग्नित आदर्श युवा मंडळ वडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी ग्राम स्वच्छता अभियान वडगाव येथे राबविण्यात आले. वडगाव येथील बस स्टँड परिसर व गावाचा मुख्य रस्ता, आंबेडकर नगर, इंदिरा नगर व ग्रामपंचायत परिसरात स्वच्छता करण्यात आली.

 

raver-swachata-abhiyan

ग्रामपंचायत कार्यालय जवळ सहभागी युवक व गावकरी यांना मार्गदर्शन करतांना नेहरू युवा केंद्राचे तालुका समन्वयक शिवदास कोचुरे म्हणाले की आपल्या परिसराची आपल्या गावाची स्वच्छता राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे ज्या पद्धतीने आज आपण आपले गाव स्वच्छ केले त्याच पद्धतीने आपले मन देखील स्वच्छ ठेवले पाहिजे आपल्या मनात असलेले द्वेष, एकमेकांप्रती असलेला क्लेश, मनातील जातिभेद नाहीसा केला पाहिजे तरच आपण निर्मळ व स्वच्छ राष्ट्र निर्माण करू शकतो. तसेच कोरोना वर जोपर्यंत उपचार येणार नाही तोपर्यंत आपण माक्स वापरले पाहिजे समाजिक अंतर पाडणे व वारंवार हात धुतले पाहिजे त्यासोबतच शासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन केले गेले तरच आपण कोरोनावर आळा घालू शकतो असे प्रतिपादन केले.

 

सदरील स्वच्छता अभियानात वडगावचे ग्राम विकास अधिकारी संतोष उचित, वडगाव चे पोलीस पाटील संजय वाघोदे, तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र वाघोदे, माजी ग्रामपंचायत सदस्य मकबूल तडवी आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष अमजत तडवी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना तालुकाध्यक्ष दिलीप पंडित, दगडू पाटील, सामाजिक कार्यकर्ते विनायक जहुरे, ग्रामपंचायत शिपाई नितीन वाघोदे यांची उपस्थिती व सहभाग लक्षणीय होता. सदरील कार्यक्रमाचे कामकाज नेहरू युवा केंद्र जळगाव चे जिल्हा युवा
समन्वयक नरेंद्र डागर व लेखापाल अजिंक्य गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर तालुका समन्वयक शिवदास कोचुरे यांनी पाहिले. तसेच स्वच्छता अभियानाच्या यशस्वीतेसाठी आदर्श युवा मंडळाचे अध्यक्ष आनंद वाघोदे उपाध्यक्ष विनायक वाघोदे सचिव सुरेश वाघोदे सिद्धार्थ युवा मंडळ कोचुर चे सत्वशील तायडे विक्रम तायडे तसेच वडगाव येथील किशोर लहासे, राजेंद्र एस. वाघोदे, निलेश वाघोदे, प्रशिक वाघोदे, शुभम वाघोदे, सागर सुरवाडे, विजय वाघोदे, अनिकेत सुरवाडे, रितीक वाघोदे, शुभम वाघोदे, निखिल वाघोदे, मुरलीधर वाघोदे, दिलीप सुरवाडे, गोविंदा वाघोदे, सचिन तायडे, भूषण वाघोदे, अमर वाघोदे, विवेक वाघोदे, सचिन( ट्रेलर ) वाघोदे, संजय गाढे, सारंग वाघोदे, पंकज वाघोदे, चेतन वाघोदे,साहिल वाघ, यांनी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमात सहभाग घेतला व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here