रावेर पोलिसांनी केली दोन एकरातील गांजा शेती उध्द्वस्त; एक जेरबंद

गांजा

जळगाव (संपादक सुनिल पाटील) । रावेर तालुक्यात गांजा शेती करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यावरून रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी छापा मारला असता दोन एकरातील १७१ किलो वजनाची गांजा शेती उध्द्वस्त केली आहे. ही गांजा शेती करणाऱ्या एकास जेरबंद करण्यात आले आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, रावेरचे पोलिस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांना दि. ९ ऑक्टोबरला रावेर तालुक्यातील मोरव्हाल शिवारात शेतात आरोपी युसूफ अकबर तडवी (50, रा. मोरव्हाल) याने त्याच्या दोन एकर शेतात तूर पिकात गांजा शेती करत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ टीमला सोबत घेत छापेमारी केल्यानंतर गांजाचे १७१ किलो वजनाची १७२ लहान मोठी झाडे जप्त करण्यात आली आहेत. जप्त मुद्देमालाची बाजार भावानुसार किंमत १७ लाख रुपये आहे.
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलिस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल, पोलिस उपनिरी तुषार पाटील, पोलिस उपनिरीक्षक मनोज महाजन, गुन्हे शोध पथकातील नाईक कल्पेश आमोदकर, कॉन्स्टेबल प्रमोद पाटील, विशाल पाटील, श्रीकांत चव्हाण, भूषण सपकाळे, राहुल परदेशी, योगेश पाटील पाल दुरक्षेत्राचे हवालदार ईश्वर चव्हाण, हवालदार जगदीश पाटील, कॉन्स्टेबल ईस्माईल तडवी, कॉन्स्टेबल गजाजन बोणे, कुंदन नागमल चालक हवालदार गोपाळ पाटील आदींच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here