दस मोहर्रमच्या (यौम-ए-आशूरा) निमित्ताने श्रद्धा आणि बलिदानाची आठवण

मुहर्रम

सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : मुहर्रमच्या पवित्र महिन्यातील दहावा दिवस, ज्याला यौम-ए-आशूरा म्हणूनही ओळखले जाते, याच दिवशीं म्हणजे यौम-ए-आशूरा च्या दिवशीं अनेक घटना (वाकेआत) घडलेल्या आहे हा इस्लामिक इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा दिवस आहे. सावदा येथे आज या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या दिवशीं हज़रत इमाम हुसैन रदिअल्लाहुअन्हु आणि त्यांच्या साथीदारांच्या कर्बलाच्या युद्धातील शहादत आणि बलिदानाची आठवण करून खिराज़े अकीदत वाहण्यात आली.

यौम-ए-आशूरा दिनाच्या निमित्ताने सावदा येथील रस्त्यांवर आणि मस्जिदींमध्ये शर्बत वाटपाचा रिवाज मोठ्या भक्तिभावाने पाळण्यात आला. हज़रत इमाम हुसैन रदिअल्लाहुअन्हु आणि त्यांच्या साथीदारांनी कर्बलाच्या मैदानात पाण्यासाठी झालेल्या तळमळीच्या स्मरणार्थ हा रिवाज पाळला जातो. स्थानिक रहिवाशांनी आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन शर्बत वाटपाचे स्टॉल लावले, जिथे सर्वधर्मीय लोकांनी सहभाग घेतला. यामुळे सामाजिक एकतेचे दर्शन घडले.
या पवित्र दिवशीं सुन्नतनुसार रोजा ठेवण्याची आणि इबादत करण्याची प्रथा पाळली जाते. यौम-ए-आशूरा हा केवळ शोकाचा दिवस नसून, हज़रत इमाम हुसैन रदिअल्लाहुअन्हु यांच्या सत्य आणि न्यायासाठी दिलेल्या बलिदानाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. सावदा येथील मस्जिदींमध्ये विशेष नमाज आणि मजलिसांचे आयोजन करण्यात आले, ज्यात मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग घेतला.
यौम-ए-आशूरा हा दिवस आपल्याला धैर्य, बलिदान आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. हज़रत इमाम हुसैन रदिअल्लाहुअन्हु यांचे बलिदान आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण देते.” यानिमित्ताने सावदा येथील नागरिकांनी शांतता आणि बन्धुभावाचा संदेश दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here