नाशिक (उपसंपादक इजि कुबेर जाधव) : उमराणा बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रोख पेमेंट देण्यात येत असून शेतकरी हिताचे निर्णय घेतले जात असल्याने याठिकाणी कांद्यासह इतर शेतमालाची आवक दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आपण गट तट बाजूला ठेवून सर्वाना सोबत घेऊन बाजार समितीच्या नावलौकिकात भर टाकण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असून, सहकारी संचालकांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही, मी गेली ३० /३५ वर्ष घरांवर तुळशी पत्र ठेवुन स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे व स्वर्गिम आनंद दिघे यांच्या कृपा आशिर्वादाने वाटचाल करीत आहे,तुमच्या सारख्या सहकार क्षेत्रातीलअनुभवी मंडळींकडून सत्कार होत असल्याने माझी आता निश्चितच जबाबदारी वाढल्याचे प्रतिपादन उमराणा येथील निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती देवानंद वाघ यांनी केले.
आज देवळा येथील भाऊसाहेब पगार यांच्या पतसंस्थेच्या कार्यालयात सभापती वाघ यांचा रविवारी दि ६ रोजी सत्कार करण्यात आला . यावेळी ते बोलत होते . याप्रसंगी देवळा बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब पगार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते,तथा विठेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन कुबेर जाधव उमराणा बाजार समितीचे माजी उप सभापती मिलिंद शेवाळे ,शिवसेनेचे (शिंदे गट ) देवळा तालुका प्रमुख दीपक निकम ,,डॉ जे, डी, पवार विकास सोसायटीचे चेअरमन दीपक पवार , विठेवाडी विकास सोसायटीचे व्हा चेअरमन कैलास कोकरे , जेष्ठ संचालक महेंद्र आहेर, सेवानिवृत्त प्राध्यापक बापू रौदळ , दत्तु अहिरे,पत संस्थेचे व्यवस्थापक सतिष पाटील, हितेंद्र निकम,अनिल आहेर, आदी उपस्थित होते .
दरम्यान , देवळा बाजार समितीचे माजी संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष जगदीश पवार यांचा मुलगा कु प्रथमेश हा सी,ए, च्या शासकिय अंतिम परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याने त्याचाही यावेळी सत्कार करण्यात आला , यावेळी देवळा तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या वतीने सभापती देवाजी वाघ यांचा जाहीर सत्कार व सहकारणामा या संदर्भ ग्रंथांची प्रत लेखक कुबेर जाधव यांनी भेट दिली,
फोटो ओळ ; देवळा / उमराणा बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती देवानंद वाघ यांचा सत्कार करताना भाऊसाहेब पगार , कुबेर जाधव , दीपक पवार आदी







