ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) : उल्हासनगर गुन्हे शाखा, घटक – ४ च्या पोलिसांनी शहरातील घरफोडीच्या घटनांवर लक्ष ठेवून, एका सराईत आरोपीला पकडण्यात यश मिळवले आहे. हा आरोपी दिवसा घरफोडी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार त्यांनी सापळा रचून त्याला अटक केली.
ठाणे पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात बदलापुर पोलीस ठाण्याचे हद्दीत दिनांक ०१/०७/२०२५ रोजी घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा पटक-४ कार्यालयाकडुन करण्यात येत असतांना पोहवा / ३२१६ गणेश गावडे यांना तांत्रिक तपासाच्या आधारे व त्यांचे गुप्त बातमीदाराकडून “बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. २५४/२०२५ बी.एन.एस. २०२३ चे कलम ३३१(३), ३०५ प्रमाणे दाखल गुन्हयातील संशयीत आरोपी नामे रोशन बाळा जाधव हा बंद अमरडाय कंपनी जवळ उल्हास नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उल्हासनगर-१ येथे फिरत असल्याची माहिती प्राप्त झाली” करीता उल्हासनगर क्राईम बेंच युनिट-४ चे पोलीस अधिकारी व पथकाने कारवाई करून आरोपी नामे रोशन बाळा जाधव वय ३४ वर्षे, रा. हनुमान मंदिर जवळ, निळजेगाव, कल्याण फाटा, डोंबिवली पूर्व, जि. ठाणे यास ताब्यात घेतले व बदलापुर पो.स्टे. गुन्हा रजि.नं. २५४/२०२५ बी.एन.एस.२०२३ चे कलम ३३१(३), ३०५ प्रमाणे दाखल गुन्हयात अटक केली. त्याचेकडून घरफोडी चोरीच्या गुन्हयामधील सोन्या, चांदीचे दागिणे, दोन लॅपटॉप, दोन मोबाईल, तसेच रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
खालील नमुद प्रमाणे घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. १) बदलापुर पश्चिम पो.स्टे.गु.र.नं. २५४/२०२५ बीएनएस २०२३ ने कलम ३३१(३),३०५ प्रमाणे, २) बदलापूर पूर्व पो.स्टे.गु.रजि.नं. ३९१/२०२५ बी.एन.एस. २०२३ चे कलम ३३१(३), ३०५ प्रमाणे ३) बदलापूर पुर्व पो.स्टे.गु.रजि.नं.३५७/२०२५ बी.एन.एस. २०२३ ने कलम ३३१ (३),३३१ (४), ३०५, ४) बदलापूर पूर्व पो.स्टे.गु.रजि.नं.३७०/२०२५ बी.एन.एस.२०२३ चे कलम ३३१ (३), ३३१(४), ३०५, ५) बदलापूर पूर्व पो.स्टे.गु.रजि.नं.२२९/२०२५ बी.एन.एस.२०२३ चे कलम ३३१ (४),३०५.६२.३(५), ६) बदलापूर पुर्व पो.स्टे.गु.रजि.नं.३७१/२०२५ बी.एन.एस.२०२३ चे कलम ३३१(१),३०५ प्रमाणे, ७) बदलापूर पूर्व पो.स्टे.गु.रजि.नं.३०७/२०२५ बी.एन.एस.२०२३ चे कलम ३३१ (३),३०५ प्रमाणे, ८) शिवाजीनगर पो. स्टे गु. रजि.नं. ४७८/२०२५ बी.एन.एस.२०२३ चे कलम ३३१(३), ३०५ (ए) प्रमाणे.
गुन्हे शाखा घटक ४ उल्हासनगर यांनी परिमंडळ ४, उल्हासनगर यांच्या हद्दीत वेग-वेगळया पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेल्या एकूण ०८ गुन्हे आरोपी रोशन बाळा जाधव यास अटक करून उघडकीस आणले आहेत. सदर गुन्हयामध्ये अटक आरोपीने चोरी केलेले १८९.१७ ग्रॅम वजनाचे १५,१३,३६०/- रू.कि.चे सोन्याचे दागिने व १०,०००/- रू. कि.चे चांदीचे दागिणे, ८०,०००/- रू.कि. चे दोन लॅपटॉप, ५०,०००/- रू.कि.चे दोन मोबाईल फोन आणि गुन्हयात चोरी गेलेल्या रक्कमेपैकी ३,२८,०००/- रू. रोख रक्कम असा एकुण १९,८१,३६०/- रू. किमचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त, अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध १) शेखर बागडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी, सपोनि/श्रऔरंग गोसावी, पोहवा/गणेश गावडे, राजेंद्र थोरवे, योगेश वाघ, चंद्रकांत सावत, रितेश वंजारी, मंगेश जाधव, पोना कुसूम शिंदे, विक्रम जाधव, पोशि/संजय शेरमाळे, अशोक थोरवे, प्रसाद तोडलीकर, रेवणनाथ रोकडे, रामदास उगले नेमणूक गुन्हे शाखा, मटक-४, उल्हासनगर यांनी केलेली आहे. या कारवाईमुळे, शहरात दिवसा होणाऱ्या घरफोड्यांवर नियंत्रण मिळवण्यास पोलिसांना मदत होईल.







