ड्रग्जचे सेवन करून केले स्तनपान; बाळाचा दुर्दैवी मृत्यू

brest-feeding

आईवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

न्यू ओरलिएन्स (अमेरिका) – गरोदरपणात व बाळाला स्तनपान करताना कोणतेही व्यसन करणे हे बाळाच्या जीवाला धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या काळात डॉक्टर व्यसन न करण्याचा सल्ला देत असतात. मात्र एका व्यसनाधीन आईने डॉक्टरांच्या या सल्ल्याला फाट्यावर मारत ड्रग्जचे सेवन केल्यानंतर तिच्या तीन महिन्यांच्या बाळाला दूध पाजले. त्यामुळे अमली पदार्थ दूधातून बाळाच्या पोटात गेल्याने बाळाचा मृत्यू झाला आहे.

 

अमेरिकेतील न्यू ओरलिएन्स शहरात ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी त्या महिलेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. ऑटम ब्लेंसेट असे त्या महिलेचे नाव आहे. नशेच्या धुंदीत ऑटमने बाळाला भुक लागली तसे स्वत:चे दुध पाजले. त्यानंतर काही तासानंतर बाळ बेशुद्ध पडले. त्यानंतर ऑटमने मेडिकल इमर्जन्सीला कळवले. तत्काळ अॅम्ब्युलन्स आल्यानंतर डॉक्टरांनी बाळाला तपासले असता बाळाचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

त्यानंतर डॉक्टरांनी बाळाची तपासणी केली असता त्याच्या रक्तात ड्रग्ज आढळून आले. त्यानंतरपोलिसांनी बाळाच्या आईची चौकशी केली तेव्हा तिने घडलेला प्रकार सांगितला. तसेच घराची झडती घेतली असता पोलिसांना घरात ड्रग्ज देखील सापडले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here