गोळीबार करणाऱ्या टोळीतील दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी घेतले ताब्यात

pune-arrested

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – पुर्वीच्या भांडणाच्या रागातून तरूणावर गोळीबार करून परिसरात दहशत पसरविणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केले. त्यांच्याकडून पिस्तूल आणि काडतुस जप्त करण्यात आले आहे.

 

सोन्या कांबळे आणि विशाल सोमवंशी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. टोळीप्रमुख गणेश पवार याच्या सांगण्यावरून तरूणावर गोळीबार केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

 

मागील भांडणाचा राग मनात धरून कुख्यात गुंड गणेश पवार आणि त्याच्या टोळीने 10 डिसेंबरला सिद्धीक मौला शेख रा. शनिनगर यांच्यावर गोळीबार केला होता. त्याला कोयत्याने मारहाण करून परिसरात दगडपेâक करीत दहशत माजवून पळ काढला. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिस तपास करीत होते. तरूणावरील गोळीबार पवार टोळीतील सोन्या कांबळे आणि विशाल सोमवंशी यांनी केल्याची माहिती पोलीस अमंलदार सर्कराज देशमुख आणि सचिन पवार यांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही साताऱ्यातील सुरूस फाटा येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. ही कामरिगी पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक सर्जेराव बाबर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे, पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, संतोष भापकर, सोमनाथ सुतार, रवींद्र भोसले, सर्कराज देशमुख, सचिन पवार, अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here