नेरळ येथे सुटकेसमध्ये आढळले मृतदेहाचे तुकडे

deadbody-in-suitcase
संग्रहित छायाचित्र

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – नेरळ रेल्वे स्थानकाजवळच्या नाल्यामध्ये दोन सुटकेसमध्ये मृतदेहाचे तुकडे आढळून आल्याने या परिसरात बुधवारी खळबळ उडाली. या मृतदेहाची ओळख पटली असून त्याचे नाव सुशीलकुमार सरनाईक असे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

रेल्वे स्थानकाजवळच्या नाल्यामध्ये दोन सुटकेस असल्याचे निदर्शनास आल्यानंतर स्थानिकांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी सुटकेसची तपासणी केली असता त्यात मानवी मृतदेहाचे तुकडे आढळून आले. या मृतदेहापासून काही अंतरावर टाकण्यात आलेल्या एका प्लॅस्टिक पिशवीमध्ये काही धारदार शस्त्रे आढळली.

 

सीसीटीव्ही फुटेजच्या साह्याने पोलिसांनी तपास सुरू केला. हा मृतदेह ३१ वर्षीय सुशीलकुमार सरनाईक याचा असल्याचे तपासात उघड झाले आहे. सुशीलकुमार हा आरोपी चार्ल्स नाडार याच्या पत्नीचा मित्र होता. तिच्या चारित्र्याविषयी संशय घेतल्याच्या रागातून सुशीलकुमारचा खून करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here