ब्लॅकमेल करत २१ वर्षे केले लैंगिक शोषण; ४२व्या वर्षी केली हत्या

up-crime

पीलीभीत – उत्तर प्रदेशातील पीलीभीतमध्ये एका ४२ वर्षीय महिलेची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कॉलेजातील एक क्लार्क आणि त्याच्या दोन साथीदारांवर हत्येचा आरोप आहे. २१ वर्षांपासून या आरोपींनी तिचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर मालमत्तेच्या लालसेपोटी त्यांनी तिची निर्घृण हत्या केली.

 

पीलीभीत पोलिसांनी कोर्टाच्या आदेशानंतर मुख्य आरोपी आणि त्याच्या साथीदारांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिसांकडे अनेकदा याबाबत तक्रारी करूनही काही उपयोग झाला नाही. अखेर न्यायालयाचा दरवाजा ठोठावला, असे मृत महिलेच्या वृद्ध आईने सांगितले. सुनगढी पोलीस ठाण्याचे एसएचओ अतर सिंह यांनी सांगितले की, तिन्ही आरोपींच्या विरोधात कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल.

 

मृत महिलेच्या वृद्ध आईने घडलेली घटना सांगितली. माझी मुलगी २१ वर्षांची होती. त्यावेळी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. आरोपी रमेश सिंह हा महाविद्यालयात क्लार्क होता. त्याचे आणि माझ्या मुलीचे प्रेमसंबंध जुळले. त्यावेळी त्याने तिचे काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर तो ब्लॅकमेल करू लागला. माझ्या मुलीचे आयुष्य खूपच खडतर झाले. तिचे लग्न झाल्यानंतर आरोपीने तिच्या पतीला सर्व सांगितले. त्यामुळे त्यांचा घटस्फोट झाला. मुलीच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर आरोपीचे घरी येणे-जाणे वाढले. मी हतबल होती. रमेश हा नेहमी येताना सोबत त्याचा साथीदार चंद्रशेखर आणि दिलीप सिंह यांनाही घेऊन येत होता. १२ मार्च रोजी काही कामानिमित्त मी घराबाहेर होते. त्या तिघांनी मिळून माझ्या मुलीची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह जाळला. घरातील सर्व दागिने चोरले तसेच घराचा वरचा मजल्यावर कब्जा केला, असे तिने सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here