संबधित यंत्रणेने पाळत ठेवत,एखाद्या निष्पापास ईजा करतील,त्या अगोदर जेरबंद करत, कायद्याने ईलाज करावा…
दोंडाईचा (विशेष प्रतिनिधी) – सध्या गाव व गावाची परिस्थिती वरून खालून सर्व यंत्रणेला परिचीत आहे. म्हणजे एकदंरीत गावाचे वातावरण गढूळ झाले आहे,आणि ह्या गढूळ वातावरणाचा काहीजण फायदा घेत, मोकाट,लेबल नसताना विनाकारण भुंकायला सुरूवात केली आहे. म्हणून असे हे विनाकारण भुकंणारे, निष्पाप, येणारे-जाणाऱ्यांना नाहक त्रास देण्याचा हेतू पुर्वनियोजीत बाळगत ,गावात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती येणाऱ्या काळात बिगडवण्याची मंजुषा ठेवणाऱ्यांना संबधित यंत्रणेने वेळीच जेरबंद, कडक कार्यवाही करत, भविष्यात होणारी मोठी घटना टाळता येऊ शकते, असा सुर सध्याच्या बेवजह भुंकण्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असणाऱ्या जाणकार समाज विश्लेषकांकडून निघत आहे.
आज करोना पाश्वभुमीवर, लाँकडाऊन नतंर सर्वच व्यापार-व्यवसाय, विवाहसोहळे,सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमावर बंधने आणत. जनजीवनसह इतर गोष्ट्रींना पुर्वपदावर येत,येत जवळपास वर्षभर लागणार आहे. तसेच गावातील नगरपालिका निवडणूकीलाही वर्षभर अवधी आहे. त्यासाठी सरकारने राज्यातील जनतेला करोना आजाराला हलक्यात न घेता, स्थानिक जिल्हाधिकारी यांच्यामार्फत आपापल्या जिल्हयांची परिस्थिती पाहून, गाईडलाईन जारी करत, प्रत्येकाला मास, सोशल डिस्ट्न्सिंग,कोणत्याही सार्वजनिक, सामाजिक, सांस्कुतिक, राजकीय ठिकाणी जास्त गर्दी न बाळगण्याचे स्ट्रीक आदेश दिले आहे. तसेच जोकोणी व ज्याठिकाणी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग प्रतिबंध अधिनियम १८५७ , महाराष्ट्र कोवीळ-१९ उपाययोजना २०२०, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम व प्रचलित कायद्याप्रमाणे योग्य काळजी न घेता, नियमांचे उल्लंघन करत असेल, अशी जिल्हा व गावातील कोणतीही व्यक्ती असो ,अशांवर गुन्हा दाखल करत कडक कार्यवाही करायचे जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहेत.
मात्र गावात मागील काही दिवसांपासून करोना आजारावर खबरदारी घेत, शासनाने लावलेले सर्व नियम धाब्यांवर बसविले जात आहे. मग ते विवाहसोहळे असो का एखाद्या राजकीय व्यक्तीचे स्टेज असो. म्हणजे एखाद्या गरिब चुकला,गाडी चोरली तर त्याला सर्व नियम ,कायदे,जेल आणि तोच एखाद्या श्रीमंत, राजकीय चुकला ,गाडी चोरली तर त्याच्यासाठी वेगळे कानून-कायदे ,मुबा देणे हे तर योग्य नाही आहे. म्हणून गावात कायद्याची ही दुफळी सर्वसामान्य माणसाला मोकळेपणाने श्वास घेऊ देत नाही आहे. म्हणजे ज्यांचे गावात कायदा वागवणाऱ्या व्यक्तीवर पकड आहे. तो त्याच्या पद्धतीत कायदा खरा-खोटा वागवत आहे आणि ज्यांचे कायदा वागवणाऱ्या व्यक्तीवर पकड नाही. तो लहान-लहान गोष्ट्रींसाठी व कधी-कधी चुक नसताना, सत्य बोलण्यामुळे नाहक कायदयाच्या कचाटीत अनेक दिवस बरळडला जात आहे. म्हणजे ती म्हण आहे ना,बोलणाऱ्याचे खराब बोर ही विकले जाते आणि न बोलणाऱ्याचे चांगले बोरही विकले जात नाही. याच पाश्वभुमीवर गावात कायदा वाकवणाऱ्याच्या बाजूने लोक उभे राहत आहे. म्हणून कायद्याची ही विसंगती सर्वसामान्य माणसाला पेचात टाकणारी आहे. म्हणून काही दिवस अगोदर शासनाचे नियम मोडणारी घटना झाल्यावरही कायद्याने काहीच होत नसल्याने, विनालेबल,मोकाट फिरणाऱ्या, भुंकणाऱ्यांची गावात संख्या वाढली आहे. कोण कोणाला,कोणत्या गोष्ट्रीवरून चावा घेईल हे सांगता येत नाही. पण यांचा त्रास सर्वसामान्य माणसाला होता कामा नये. कारण भारत देशात प्रत्येकाला आपले मत व्यक्त करायचा अधिकार आहे. त्यामुळे व्यापार-व्यवसाय, रोजगाराने हताश झालेला माणूस ,सहज चालू धर्तीवर जे सत्य असेल ,ते बोलतो. पण काही पायाळू त्या परिस्थितीचा फायदा घेत,चावा घेतात किंवा चावा घेण्याचा,त्रास देण्याचा प्रयत्न करतात. म्हणून अशा ह्या कायदा वाकवणाऱ्या प्रवुत्ती,व तिची झुंड बनवू ईच्छिणांऱ्या लोकांवर वेळीच कायदा वागवणाऱ्या अधिकाऱ्यांनी निर्बंध लादून, कायद्याच्या कचाटीत घेत कठोर कार्यवाही करायला हवी, तरच सर्वसामान्य माणसाला येथे जीवन जगता येईल अशी अपेक्षा आताच्या नाहक,बेवजह भुंकणाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असलेल्या समाज विश्लेषक मंडळीजनता करत आहे.
मात्र आता सध्यास्थितीत काही दिवस, मोजून का असेना, शिकणारा वरिष्ठ अधिकारी वीस जानेवारीपर्यंत लाभल्याने गावाची परिस्थिती बदलली आहे व त्यानंतर येणारे अधिकारी पुढेही ती अशीच सुरू ठेवणार, अशीही अपेक्षा नागरिक करत आहे.




