शनिशिंगणापुरात दोन कमिशन एजंटांवर पोलिसांची कारवाई

shani-shignapur

नगर (प्रतिनिधी) – शनिदर्शनासाठी आलेल्या भाविकांचे वाहन अडवून त्यांना ठराविक दुकानावरूनच पुजासाहित्य घेण्याची सक्ती करत दमदाटी करत असलेल्या दोन कमिशन एजंटांवर (लटकू) शनिशिंगणापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली.

 

भाविकांच्या वाढत्या तक्रारीनंतर सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांनी सोनई व घोडेगाव रस्त्यावर गस्त घालत लटकूंना सळो की पळो केले. वैष्णवी हॉटेलसमोर व कुर्‍हाट पार्किंगसमोर भाविकांची अडवणूक करत असलेल्या सुमीत बबन शिंदे (वय 20) व रमेश सुखदेव फुलारे (वय 25) दोघेही रा. सोनई यांना अटक करण्यात आली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांचेसह हवालदार अनिल देवकर, बापू फुलमाळी, मोहन बडे, डी. व्ही. झरेकर व पथकाने रस्त्यावर व गावात गस्त घालत कारवाईचा धडाका लावला. या कारवाईने काल दिवसभर भाविकांची अडवणूक कमी प्रमाणात झाली. शिंगणापूर ग्राम-पंचायतीच्या बंद असलेल्या प्रवासी करनाक्यावर लटकूंनी ताबा घेतला असून हा प्रकार पोलिसांनी तातडीने बंद करावा,अशी मागणी भाविक व ग्रामस्थांनी केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here