इंटरव्ह्यूसाठी तरुणीला हॉटेलमध्ये बोलावून केला सामूहिक बलात्कार

gang-rape

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील मुरादाबाद शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीच्या एका तरुणीवर हॉटेलमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. शनिवारी ही घटना घडली. पोलिसांनी दुसऱ्या दिवशी रविवारी दोन आरोपींना अटक केली. पीडितेला नोकरीचे प्रलोभन दाखवून इंटरव्ह्यूसाठी मुरादाबाद येथे बोलावले होते.

नोकरीचे प्रलोभन दाखवून मुरादाबाद येथे बोलावून घेतले आणि तिथे हॉटेलमध्ये दोघांनी बलात्कार केल्याचा आरोप दिल्लीच्या तरुणीने केला आहे. मुलीच्या आईने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यासोबत हिंदू जागरण मंचाचे नेते, कार्यकर्तेही होते.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंड येथील तरुणांनी तरुणीला नोकरीचे प्रलोभन दाखवून मुरादाबाद येथे बोलावले. त्यानंतर तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी सांगितले की, हॉटेलवर बोलावल्यानंतर दोघांनी शितपेयातून गुंगीचे औषध दिले आणि बलात्कार केला, असा आरोप मुलीने केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तरुणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here