काशीमीरा येथे २५ लाखांचे एमडी जप्त

-drugs

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – काशीमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एमडी (मेफोड्रोन) हे अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एका तस्करास मीरा-भाईंदर गुन्हे प्रकटीकरण शाखेने सोमवारी रात्री अटक केली आहे. त्याच्या कडून २५ लाख रुपये किमतीचे एमडी अमलीपदार्थ जप्त केले आहे.

दहिसर चेकनाक्या जवळील ठाकूर मॉलसमोर चारचाकी मोटारीतून एक इसम एमडी हे अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मीरा – भाईंदर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना मिळाली होती . वनकोटी सह सहाय्यक निरीक्षक विलास कुटे व त्यांच्या पोलीस पथकाने साफळा रचला होता . माहिती नुसार वर्णनाची एक मोटार आली असता पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात अमली पदार्थ आढळून आले . याप्रकरणी काशिमिरा पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here