लासलगावचा मंडल अधिकारी लाच स्विकारताना ‘एसीबी’च्या जाळ्यात

acb

नाशिक (विशेष प्रतिनिधी कुबेर जाधव) – निफाड तालुक्यातील लासलगाव येथील मंडल अधिकारयाला साडेतीन हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. रमेश निंबा बच्छाव असे लाच स्वीकारणाऱ्या मंडल अधिकाऱ्याचे नाव आहे.

बच्छाव या मंडल अधिकाऱ्याने खडक माळेगाव येथील तक्रारदाराकडे खरेदी केलेल्या शेतजमिनीला त्यांचे नाव लावून नाव नोंदणी करण्यासाठी आज 3 हजार 500 रुपयांची लाचेची मागणी केली होती.

त्यानंतर तक्रारदाराने याबाबतची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. त्यानुसार, निफाड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय येथे सापळा रचण्यात आला. याठिकाणी साडेतीन हजाराची लाच स्वीकारताना मंडल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here