संपत्तीसाठी नवऱ्याने शॉक देऊन केली बायकोची हत्या

wife-murder

तिरुअनंतपुरम (केरळ) – बायकोच्या संपत्तीच्या लोभाने एका नवऱ्याने तिला शॉक देऊन ठार मारल्याची घटना घडली आहे. एवढेच नाहीतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने शॉक लागून तिचा मृत्यू झाल्याचा बनाव आखला. पण, अखेर पोलीस चौकशीत त्याचं पितळ उघड पडलं.

याप्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरु आहे. केरळच्या तिरुअनंतपुरम येथील ही घटना आहे. इथल्या काराकोणम येथील शाखाकुमारी ही महिला पती अरुणसोबत राहत होती. जोडप्याचे काही महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. पण त्यांचे एकमेकांशी पटत नसल्याने त्यांच्यात सतत वाद होत असत.

अरुणने तिच्यामागे घटस्फोटासाठी तगादा सुरू केला होता. मात्र शाखाकुमारीला घटस्फोट मान्य नव्हता. त्यामुळे तो तिचा काटा काढण्याच्या तयारीत होता. त्याने याआधीही तिला शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यात तो अपयशी ठरला.

शनिवारी शाखाकुमारी हिचा मृतदेह घरात आढळला. नाताळसाठी लायटिंग केली होती त्याचा शॉक लागून शाखाकुमारी यांचा मृत्यू झाला, असे अरुणने भासवले. शिवाय अरुण तिला एका खासगी रूग्णालयातही घेऊन गेला होता. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

पोलिसांनी तपास सुरू केला असता घरात रक्ताचे डाग सापडले. त्याच्यावरून पोलिसांना काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. अधिक तपास केला असता अरुणने बायकोला शॉक देऊन हत्या केल्याचे कबूल केले आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here