यावल (तालुका प्रतिनिधी डॉ.अमोल साळंके) – फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात कर्मयोगी, थोर स्वातंत्र्यसेनानी धनाजी नाना चौधरी यांची 68 वी पुण्यतिथी निमित्त अभिवादन सभा संपन्न झाली.
यात तापी परिसर विद्या मंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक डॉ सुधाकर काशिनाथ चौधरी, सचिव प्रा मुरलीधर तोताराम फिरके, सदस्य प्रा पी एच राणे यांच्या शुभहस्ते कै धनाजी नाना चौधरी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. यावेळी कै लोकसेवक मधुकरराव चौधरी औषधनिर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही आर पाटील, औषधनिर्माण पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर एल चौधरी, महाविदयालयाचे उपप्राचार्य प्रा अनिल सरोदे, डॉ अनिल भंगाळे, डॉ सतीश चौधरी, डॉ एन एल चव्हाण, श्री नितीन सपकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.







