ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – आदिवासी समाजाच्या 3 वर्षीय चिमुरडीला घरातून उचलून नेऊन तिच्यावर पाशवी अत्याचार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना पेणमध्ये घडली आहे. मधुकर पाटील (वय-34) असे आरोपीचे नाव असून पोलीसांनी त्याला राहत्या घरातून अटक केली आहे.
या घटनेचा पेणच्या समस्त नागरिकांनी निषेध केला असून अती जलद न्यायालयात खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे पेण शहराजवळील प्रायव्हेट हायस्कूल जवळच्या पांचोळा आदिवासीवाडी आदिवासी लोकवस्ती मधील 3 वर्षीय चिमुरडीवर तीच्या घरातून उचलून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला व तिची हत्या केली.
याप्रकरणी आरोपीवर अपहरण, बलात्कार, निर्घृण हत्या व पाॅस्को, अॅट्राॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर अतिजलद न्यायालयात खटला चालविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे दुधे यांनी सांगितले.







