२४ मोबाईल फोन हस्तगत कासारवडवली पोलीस स्टेशनची कारवाई
मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – कासारवडवली पोलीस स्टेशन हद्दीतील वेलकम मोबाईल शॉप असून सदर दुकानाचे मालक हे दिनांक २५.१२.२०२० रोजी रात्री २२.00 वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते ते दिनांक २६.१०.२०२० रोजी सकाळी ०९.०० वाजेच्या सुमारास येवून त्यांनी त्यांचे दुकान उघडले असता त्यांना दुकानाचे वरील पत्रा तुटला असल्याचे दिसून आले व त्यांनी दुकानात पाहणी केली असता त्यांना दुकानांतील मोबाईल फोन हे चोरी झाले असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी दिनांक २६.१२.२०२० रोजी अज्ञात आरोपीविरुध्द दिलेल्या तक्रारीवरून कासारवडवली पोलीस स्टेशन येथे गु.रजि. क्रमांक ३२३ /२०२० भा. दं.वि कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
गुन्ह्याचा प्रकार पाहता यातील अज्ञात आरोपी निष्पन्न करून गेला मुद्देमाल हस्तगत करणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स.पो.नि सागर जाधव व त्यांचे पथक काशिमीरा,कापूरबावडी,वर्तकनगर इत्यादी परिसरात जावून व घटनेबाबत बातमीदार यांना माहिती देवून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरु केले होते.
दिनांक २९.१२.२०२० रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.किशोर खैरनार यांना गुन्ह्यातील आरोपीबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी तपास पथकास माहिती देवून त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस पथकाने आनंद नगर या ठिकाणी सापळा रचून आरोपीत नामे यश दशरथ गायकवाड, वय-१९वर्षे, धंदा-बेकार,राहणार- साईनाथ नगर, माजीवाडा यास दिनांक २९.१२.२०२० रोजी ताब्यात घेवून अटक करण्यात आलेली आहे.आरोपीत हा सराईत गुन्हेगार असून त्याचे कडून एकूण २४ मोबाईल फोन ७६,000/- रुपये किमतींचे हस्तगत करून सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे. अटक आरोपीत हा सराईत असून यांनी अशा प्रकारचे गुन्हे केले असल्याची शक्यता असून त्याबाबत अधिक तपास सुरु आहे. आरोपीत यास मा. न्यायालयात हजर केले असता त्यास दिनांक ४.१.२०२१ रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झाला आहे.
नमूद कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर,मा.सह पोलीस आयुक्त, सुरेश कुमार मेकला, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे अनिल कुंभारे, पोलीस उपायुक्त,परि-५ विनय कुमार राठोड ,मा.सहायक पोलीस आयुक्त,वर्तक नगर विभाग पंकज शिरसाट यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार,पो.नि(गुन्हे) अविनाश काळदाते, पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस निरीक्षक वैभव धुमाळ स.पो.नि/सागर जाधव,स.पो.नि/सहदेव पालवे,पोलीस हवा/५०४७ एस.बी.खरात,आर.एस चौधरी/३४३२,पोलीस हवा /वसंत पाटील, पोलीस हवा/ २३२४ आर.आर.पाटील, चंद्रकांत गायकवाड २५७९ पोलीस हवा/ कोरे, पो.ना/१७८ आर.एस. महापुरे,पो.ना. तायडे/१२६३,पो.ना /६६५२ रावते, पो.ना/३०४३ लिंगाळे,पो.ना/२४८४ तुषार पाटील, पो.ना/रमेश जाधव २२०७ पो.ना/ गायकवाड २९३३ पो.शि १६३०/ महाजन यांनी केलेली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस पोलीस हवा/२३२४ आर.आर. पाटील हे करीत आहेत.







