पत्नीशी भांडण झालं म्हणून दारूड्या बापानं २ महिन्यांच्या मुलाची केली हत्या

child-killed

शामली (उत्तरप्रदेश) – उत्तर प्रदेशच्या शामलीमध्ये संतापजनक घटना घडली आहे. दारूड्या बापाने आपल्या दोन महिन्यांच्या मुलाची काठीने मारहाण करून हत्या केली. पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर रागाने त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली.

भवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कादेरघर गावात ही घटना घडली. देवेंदर असे आरोपीचे नाव आहे. त्याला दारूचे व्यसन होते. यावरून दोघांमध्ये भांडण झाले होते. भांडण झाल्यानंतर त्याने तिला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी पत्नी रेणूने आपल्या कडेवर बाळ उचलले. मारहाण करताना काठी बाळालाही लागली. दोघेही यात जखमी झाले. यात बाळाचा मृत्यू झाला.

रेणूने दिलेल्या पोलीस तक्रारीनुसार, आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी देवेंदर हा फरार आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here