माहीम दर्ग्याच्या विश्वस्ताविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

mahim-dargah

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – माहीम दर्गा ट्रस्टचा विश्‍वस्त डॉ. मुद्दसिर निसार लांबे याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. सामाजिक कार्यकर्ता असलेल्या महिलने 25 दिवसांपूर्वी माहीम पोलीस ठाण्यांमध्ये लेखी स्वरुपात बलात्काराची तक्रार केली होती. त्यानंतर आरोपीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

पीडित महिलेने केलेल्या तक्रारीनुसार 28 जानेवारी 2020 ला गुंगीचे औषध आरोपीने बलात्कार केला होता. यानंतर त्याबद्दल कुठे वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची आरोपीने पीडितेला धमकी सुद्धा दिली होती. आरोपी डॉक्टर मुद्दसिर निसार लांबे हा राज्य वक्फ बोर्डाचा सदस्यही असल्याचे समोर येत आहे.

तक्रारदार महिला ही स्थानिक समाजसेविका आहे. हा प्रसंग घडल्यानंतर तिच्या पतीने घटस्फोट दिल्याचे महिलेचे म्हणणे आहे. मध्यंतरी या महिलेचे काही व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाले होते. यामध्ये न्याय न मिळाल्यास आत्महत्या करणार असल्याचे या महिलेने म्हटले होते. पोलिसांनी मुद्दसिर निसार लांबेवर गुन्हा नोंदविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here