शनैश्वर देवस्थान ट्रस्ट वाकी प्रथमवर्ष कॅलेंडर प्रकाशनाच्या निमित्ताने…

    shaneshwar-calender

    (नाशिक विशेष प्रतिनिधी इंजि कुबेर जाधव)

    नोव्हेंबर २०२०च्या एका वाकी दर्शनाच्या भेटीत, सचिनने संत काका आलेले आहेत असं सांगितल्यावर मला अपरिचित असलेल्या दोन व्यक्ती जवळ आल्या व आबासाहेब संत तुम्हीच का म्हणून विचारले. मी हो म्हटल्यावर, ‘तुम्ही लिहिलेले अनुभव आम्ही न चुकता वाचतो व पुढील लेखनाची वाट बघतो’ त्या दोन व्यक्ती होत्या औरंगाबादचे श्री दौलत खाडे व श्री. खंडू खत्री. बऱ्याच गप्पा झाल्यावर खाडे आप्पानी आपण शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे कॅलेंडर छापायचे का असा मुद्दा पुढे केला. महाराजांना विचारल्यावर, आता फारच उशीर झाला, पुढच्या वर्षी बघू, आता जाहिराती साठी भक्तांना आवाहन करता सवरता डिसेम्बर संपून जाईल. यावर खाडे म्हणाले, पहिले वर्ष आहे, सुरुवात जाहिरातींशिवाय करू, चारदोन माहितीच्या शनी भक्तांनाच आर्थिक सहभागासाठी आवाहन करू. यावर महाराजानी होकार दर्शविला.

    calnder-shaneshwar

    इथून पुढे खरी कसरत होती, वेळ कमी, फोटो, तारखां / तिथींची उपलब्धता, माहिती इत्यादी गोष्टी जमविणे व DTP करणे गरजेचे होते. खाडेंच्या ओळखीचे औरंगाबादला कुणी होतो, त्यांनी जातीने बसून सर्व डेटा उपलब्ध करून, हेडिंग फोटो डिझाईन, बॉटम फोटो सर्व गोष्टी व्यवस्थित करून व दोनच दिवसात कॅलेंडरचा मसुदा बनवून घेतला.

    यानंतर प्रश्न होता तो निधी उभारणीचा, महाराजांचा पहिल्यापासूनच आग्रह असतो, कुठलेही सामाजिक, धार्मिक काम हे जण सहभागानेच व्हावे. खाडेंशी माझी चर्चा झाली व मी मोजून पाच ते सहा जणांना व्हाट्सअँप वर निधी संकलनाचा मेसेंज दिला, त्याला कुणीही भक्तांनी प्रतिसाद दिला नाही, पुन्हा फोन करून रिमाइंडर करण्याची इच्छा झाली नाही. फक्त केंद्रीय पत्रकार संघाचे अध्यक्ष व नॅशनल ह्यूमन राईटस चे महाराष्ट्र राज्य उप अध्यक्ष श्री. शिवाभाऊ दौंड, यांच्याशी दोन वर्षांपूर्वीची ओळख असल्यामुळे फोन वर बोललो, त्यांनी याकामी मदत करण्याची तयारी दाखविली. पण दोन हजार प्रति छपाई खर्च व सर्वांची अपेक्षित रक्कम यात मोठी तफावत होती.

    मला खाडेंचा फोन आला पण भक्तांकडून निधी मागणे मला शक्य होणार नाही असं माझ्याकडून बोलल्या गेले नाही. हि गोष्ट मी फोन वर शिवाभाऊंना सांगितली, शिवाभाऊंनी आपली आणखी काही कामाचे निमित्त साधून औरंगाबाद गाठले, खाडेंशी चर्चा केली व शेवटी यथाशक्ती जमणाऱ्या निधीत मोजक्याच चार-पाच जणांच्या साहबघतुन एक हजार प्रति छापून घेऊन असे ठरले. यात खाडे आप्पांचे श्रम फारच मोलाचे, कारण व्यवसाय सोडून DTP म्हणजे करण्यापासून ते माझ्याशी, सचिनशी, शिवाभाऊ व खात्री काकांशी वेळोवेळी समन्वय साधून त्यांनी हाती घेतलेले काम नेटानं पुढे नेले.

    शनिवार दि. ०२.०१.२०२१ या दिवशी मोजक्याच शनी भक्तांच्या आर्थिक सहभागातून व श्री. दौलत आप्पा खाडे, श्री. शिवाभाऊ दौंड, श्री. खत्री काका ,आप्पासाहेब संत यांच्या अथक प्रयत्नातून शनि देवस्थान ट्रस्ट संचलित पहिलेवहिले कॅलेंडर श्री. श्री. १००८, महंत, गरीब जणांचा आधार, शनिदेवास्थान ट्रस्टचे मठाधिपती, शनिभक्त, संत श्री. सुखदेवजी महाराजांच्या हस्ते या देखण्या कॅलेंडरचे प्रकाशन करताना व शनिदेव चरणी अर्पण करताना होणार आनंद केवळ अवर्णनीय व शब्दात व्यक्त करता येत नाही.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here