क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा शिक्षण वारसा अधिकाधिक समृद्ध करावा- लेफ़्ट डॉ राजेंद्र राजपूत

faizpur

यावल (तालुका प्रतिनिधी डॉ.मोहन साळुंके) – शिक्षण रुपी ज्ञान यज्ञ माणसाचे आयुष्य समृद्ध बनवत असून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महत कष्टातून सुरू केलेल्या शिक्षण यज्ञात प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन शिक्षणाची ज्ञानगंगोत्री खेड्यापाड्यातून, आदिवासी वस्तीतून दुर्लक्षित आणि वंचित घटकापर्यंत पोहोचविणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. प्रत्येकाने स्वयम् विकास साधून समाज विकासासाठी सहभाग दयावा असे आवाहन लेफ्टनंट डॉक्टर राजेंद्र राजपूत यांनी फैजपूर येथील शितल अकॅडमी येथे आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि आजचे शिक्षण या विषयावर आयोजित परिसंवादात मत व्यक्त केले.

faizpur-1

फैजपूर शाखेच्या इंग्रजी भाषा समृद्ध करण्याचे स्वप्न बाळगून चालवलेल्या अकॅडमीत संचालक शुभम सैंदाणे यांनी विविध समाज उपयोगी उपक्रमांचा सहभाग करून घेतला आहे.

या अनुषंगाने आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी धनाजी नाना महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक लेफ्टनंट डॉक्टर राजेंद्र राजपूत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासननियमाचे तंतोतंत पालन करून हा कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात 6 वर्षीय आराध्या राजपूत हिने ही मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमुद जैन यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here