आरोग्यदायी जगण्यासाठी सायकल चालवा – आयपीएस पंकज कुमावत

dondaicha-cycle-rally

दोंडाईचा (प्रतिनिधी संतोष कोळी) – येथे माझी वंसुधरा अभिमान अंतर्गत प्रदुषण मुक्त भारत करण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येकाने महानगरपालिका व नगरपालिका, पंचायत समिती जिल्हा परिषद, प्रत्येक गावागावातिल, विविध क्षेत्रातील सायकली रँलीचे आयोजन करण्यात आले होते. यात दोंडाईच्या कराकांनी सायकल रँलीला चांगला प्रतिसाद देत,रँलीला, हिरवा झेंडा दाखवून, दोंडाईचा शहर पोलीस ठाण्याचे, प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी पंकज कुमावत साहेब यांनी प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने ,व आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी सायकल नियमीतपणे चालवायला पिहिजे असे आयपीएस अधिकारी पंकज कुमावत तोंडाच्या शहर पोलीस ठाण्याचे यांनी यावेळी,आवाहन केले.

पाच जानेवारी २०२१ रोजी आमदार तथा माजी मंत्री जयकुमारभाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाखाली व नगराध्यक्षा आईसाहेब नयनकुवरताई रावल यांच्या नेतृत्वात दोंडाईचा नगरपलीकेच्या आरोग्य विभागातर्फे माझी वसुंधरा अभियानात सायकल रँलीचे आयोजन करण्यात आले होते .रँलीस हिरवा झेंडा दोंडाईचा पोलीस स्टेशनचे परिक्षाविधीन आय.पी.एस.अधिकारी पंकज कुमावत , दोंडाईचा नगरपलीकेचे मुख्याधिकारी डॉ प्रविण निकम,भाजपा शहराध्यक्ष प्रविण महाजन , आरोग्य सभापती जितेंद्र गिरासे ,माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील, नगरसेवक कृष्णा नगराळे,भरतरी ठाकुर, हितेंद्र महाले , चिरंजीवी चौधरी, युसुफ कादीयानी, लायन्स क्लबचे हमजाभाई,राकेश अग्रवाल उपमुख्यधिकारी हर्षल भामरे , आरोग्य निरीक्षक शरद महाजन ,पत्रकार संघाचे अध्यक्ष जितेंद्र गिरासे व सर्व सदस्य इ मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना मुख्याधिकारी डॉ प्रविण निकम यांनी सांगितले की, राज्यातील सर्व शहरे स्वच्छ सुंदर व हरित व्हावी तसेच पर्यावरणाचा समतोल राखता यावा, पर्यावरणाचा ह्रास होऊ नये. यासाठी राज्य शासनाने शासन निर्णय दिनांक १४ ऑक्टोबर अन्वये माझी वसुंधरा अभियानाची घोषणा केलेली आहे.यात निसर्गाच्या पंचातत्वावर आधारित जल,वायू,आकाश, पृथ्वी व अग्नी यावर आधारित अभियान आहे.यात एकूण १५०० गुणांची स्पर्धा असून याची पाहणी शासनामार्फत मार्च २०२१ मधे होणार आहे..सदर अभियानात दोंडाईचा वरवाडे नगरपरिषद सहभागी असून अभियान अंतर्गत असलेल्या विविध घटकांचे आधारे अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे

या अभियानअंतर्गत नगरपरिषदेमार्फत पुढील काळात अनेक प्रकारच्या कडक कार्यवाही व उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यात पृथ्वी या तत्वाशी संबंधीत घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत शहरात शंभर टक्के घनकच-याचे जागीच विलगीकरन करुन शंभर टक्के कचरा संकलनावर नगरपरिषदेचा भर असणार आहे. तसेच वनीकरण,वनसंवर्धन,सांडपाणी व्यवस्थापन इत्यादी बाबींवर कार्य करण्यात येणार आहे. वायु या तत्वाचे संरक्षण करता यावे करीता हवेच्या गुणवत्तेसाठी वायुप्रदुषण कमी करुन हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणेवर भर देण्यात येणार आहे. जल तत्वाशी संबंधीत नदी संवर्धन बाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. अग्नी या तत्वाशी संबंधीत ऊर्जेचा परिणामकारक वापर ,ऊर्जा बचत तसेच ऊर्जेचा अपव्यय टाळणे या बाबींवर भर देण्यात येणार आहे. आकाश या तत्वास स्थळ व प्रकाश या स्वरुपात निश्चित करुन मानवी स्वभावातील बदलांसाठी जनजागृती करण्यात येणार आहे.

परिक्षाविधिन अधिकारी पंकजजी कुमावत यांनी सांगितले की, माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरणाचे रक्षण व्हावे व संवर्धन व्हावे. तसेच प्रदूषण मुक्त भारत व्हावा .वाहनांचा अती वापर टाळण्यात येवून पर्यावरण व स्वास्थ पूरक सायकल वापराचे प्रमाण वाढून त्याबाबत जनजागृती व्हावी असे सांगितले.

भाजपा शहराध्यक्ष प्रविण महाजन यांनी सांगितले की, प्रत्येक दहा व्यक्तींमागे सहा व्यक्ती मधुमेही आहेत. कारण आपण दैनंदिन कामकाज शारीरिक थकाव्याऐवजी मानसिक थकतो. दिवसभरात घेतलेल्या अतिरीक्त आहाराचे चरबीत रुपांतरीत होऊन दुर्धर व्याधींना सामारे जावे लागते. म्हणुन प्रत्येक व्यक्तीने शहरात फिरताना वाहनांचा वापराऐवजी सायकलचा वापर केल्यास वजन नियंत्रित होऊन वातावरणातील कार्बन उत्सर्जन कमी होते असे सांगितले.

याप्रसंगी कृष्णा नगराळे ,विक्रम पाटील इ.मान्यवरांनी सायकल स्वारांना शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन आरोग्य सभापती जितेंद्र गिरासे यांनी करतांना सांगितले की, शहरातील संपुर्ण घनकचराचे व्यवस्थापन करुन विलगीकरण करुन प्रक्रिया केली जाते. त्याचप्रमाणे नदीचे संवर्धन करुन शहरातील सर्व मोकळ्या जागांवर नयनवृक्ष वनराई साकारत आहे.

सायकल रँलीला हिरवा झेंडा दाखवुन परिक्षाविधिन अधिकारी पंकज कुमावत यांनी स्वत सायकलीवर स्वार होत संपुर्ण शहरातुन माझी वसुंधरा सुंदर वसुंधराचा संदेश दिला. सोबत मुख्याधिकारी डॉ प्रविण ,भाजपा शहराध्यक्ष प्रविण महाजन , नगरसेवक युसुफ कादीयानी, आरोग्य निरीक्षक शरद महाजन , दोंडाईचा हौशी सायकलीस्टचे राजन मोरे , प्रितम भावसार, परिमल कौटुंरवार , मास्टर बावीस्कर ,इ नागरीक सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here