सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – समाज कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य डॉ प्रशांत नारनवरे यांच्या दालनात कास्ट.कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या समवेत बैठक पार पडली.
या बैठकीत अनेक महत्वाचे विषयांवर सकारात्मक चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात आले त्यात आपल्या विभागातील राज्यात मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे भरती, रिक्त पदे, अनुशेष या विषयी चर्चा, अनुकंपतील भरती प्रकिया बाबत, कर्मचाऱ्यांचे निलंबन थांबवणे बाबत, दिव्यांग विभागातील नियम बाह्य भरती प्रक्रिया थांबविणे,आणि संबंधित संस्था चालकांवर योग्य कार्यवाही करणे बाबत५) मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या कॉलरशिप मध्ये महागाई नुसार वाढ व्हावी,तसेच तफावत दूर करून योग्य प्रमाणात मिळणे बाबत, जगातील जागतिक ३५० नामांकित विध्यापिठ मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे गुणवंत विद्यार्थ्यांना १००% कॉलरशिप मंजूर होते या बाबत चर्चा करण्यात आली.
तसेच सामाजिक स्तर उच्चवण्यासाठी विशेष मार्गदर्शन शिबिर आयोजित करून-परिवर्तन घडविणे त्यात महामंडळ, युवा केंद्र स्थापन करणे, आर्थिक विकास महामंडळ, skil Development:- प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे, लघु उद्घोग निर्माण करणे त्यासाठी लागणारे अर्थ साहाय्य शासन पुरविणे, स्मॉल स्किल मध्ये टेंडरिंग प्रोसेस साठी केंद्र सरकार अर्थ साहाय्य पुरविणे.
राज्यातील बऱ्याच जिल्ह्या मधे जिल्हा समाजकल्याण अधिकारी पदे रिक्त आहेत व त्या जागांवर प्रतिनियुक्ति वर आलेले कनिष्ठ अधिकारी कार्यरत आहेत,ते योग्य निर्णय घेत नाहीत अशा अधिकारी यांना हटवावे असे अनेक महत्वाचे विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. या कामी राज्याचे वरिष्ठ मा सुरेश तांबे साहेब,मा संतराम कांबळे साहेब,मा तुषार भालेराव साहेब,मा महेंद्र लोंढे,साहेब,सचिन सरवदे, भगवान तलवारे,राज्यातील पदाधिकारी,पुणे जिल्हा अध्यक्ष मा. आर पी इंदवे आदि पदाधिकारी उपस्थित होते







