मोटारसायकलची चावी न दिल्याने मोठ्या भावाचा केला खून

ahmedpur-police-station

लातूर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील माळेगाव (खु.) येथे मोठ्या भावाला मोटारसायकलची चावी मागितली असता न दिल्याच्या कारणावरून छोट्या भावाने डोक्यात लाकडाने मारहाण केली. यामध्ये अल्लारखा फकीर (३५) या मोठ्या भावाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजता घडली. याबाबत अहमदपूर पोलीस ठाण्यात बुधवारी भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

फिर्यादी मुनवर अल्लारखा फकीर (२७, रा. माळेगाव खु., ता. अहमदपूर) यांचे पती अल्लारखा फकीर (३५) हे मंगळवारी घरी हाेते. दरम्यान, अमर फकीर याने माेटारसायकलची (एमएच-२४ एन-९८५३) त्यांना चावी मागितली. यावेळी अल्लारखा यांनी भावाला चावी देण्यास नकार दिला. त्यावरून अमर बाबुमियाँ फकीर याने घरासमाेरील अंगणात ठेवलेल्या सरपणातील लाकडाने अल्लारखा यांच्या डाेक्यावर मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सदरची घटना माळेगाव येथील घरासमाेर घडली. याबाबत अहमदपूर पाेलीस ठाण्यात मृत अल्लारखा यांची पत्नी मुनवर फकीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमर फकीर याच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाेलिसांनी त्याला तातडीने अटक केली आहे. अधिक तपास सहायक पाेलीस निरीक्षक जे.बी. सराेदे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here