ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – वागळे ईस्टेट पो.स्टे गु.रजि.नं.ा 06/2020 भादंवि कलम 363 प्रमाणे दिनांक 06/1/2021 रोजी दाखल गुन्हयाचे अनुषंगाने आरोपीत यांचा वपोनिरी/श्री.ढोले यांचे मार्गदर्शनाखाली पोनिरी/मुतडक (गुन्हे), तसेच तपास पथकातील पोउपनि/निकुंभ, पो.हवा/6005 रावते, पो.ना/3065 मोरे,पो.ना/735 थोरात,पो.ना/6674 जाधव,पो.शी./ 2561 बरले,पो.शी./7819 शेलार,मपोना/4850 सादये असे आरोपीत यांचा शोध घेत असतांना इंदीरानगर मार्केट परिसरात एक इसम घूटमळतांना आढळून आल्याने त्याचे विषयी संशय बळावल्याने त्यास हटकले असता तो त्या ठिकाणाहून निघून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना आम्ही तपास पथकासह त्यास घेरले व त्यास त्याचे तेथे येण्याबाबत कसून चौकशी केली असता त्याने दाखल गुन्हयातील लहान मुले हे त्याचे समवेत असलेल्या महिलेसह सदर परिसरातील एका गल्लीमध्यें असल्याचे सांगितले.त्या इसमास घेवून इंदीरानगर आंबेवाडी भाजी मार्केट समोरील गल्लीत आलो असता त्या ठिकाणी एक महिला तिच्या समवेत दोन लहान मुली कु.आफरिन वय अंदाजे 7 वर्षे,व दुस-या मुलीचे नांव कु.मजहबी वय अंदाजे 6 वर्षे असे मिळून आले. सदर इसमास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव विजय अनिल गमरे,वय-29 वर्षे, राह-बायर इंडीया कंपनी,कोलषेत,कापूरबावडी,ठाणे प,व त्याचे बरोबर असलेल्या महिलेचे सुफियाना उर्फ गौरी नसिरुल्लाह उर्फ समिर शेख,वय-22 वर्षे,राह-राजेश टेलर,शीवसेना शाखेजवळ,आंबेवाडी,वागळे इस्टेट ठाणे प असे असल्याचे सांगितले.
सदर गुन्हयातील अपहृत मुलींचा 12 तासाचे आत शोध घेवुन गुन्हयातील एक पुरुष व एक महीला आरोपी यांना अटक करण्यात आली असुन, यातील अपहृृत मुली कु.आफरिन वय अंदाजे 7 वर्षे व कु.मजहबी वय अंदाजे 6 वर्षे यांना सुखरुपरित्या त्यांचे पालकांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.







