दोंडाईचा (प्रतिनिधी संतोष कोळी) – जन्मतः मुक व बधीर असलेल्या मुलांना काँकलियर इम्पल्नाट शस्त्रकिया शिबिर रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्स व आर सी सी अपंग राऊंड टाऊन दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योगपती सरकारसाहेब रावल ,प्रमुख पाहुणे नाशिक येथील सुप्रसिद्ध कान नाक घसा तज्ञ डॉ शब्बीर इंदौरवाला ,रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष चेतन सिसोदिया , डॉ मुकुंद सोहनी ,प्रो चेअरमन हुसेन विरदेलवाला इ.मान्यवर उपस्थित होते.
सरकारसाहेब रावल यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की मी कधीही भिकारीला भिक देत नाही त्याऐवजी त्याला खायला देऊन काम करण्यास प्रवृत्त करतो ,रोटरीच्या माध्यमातून २५ वर्षापासुन आय हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली त्यापासुन लाखो लोकांना फायदा झाला सोहनी परिवाराच्या माध्यमातून जयपुर फुट सुरु झाले असे अनेक समाजातील गरजुसांठी हुसेनभाई नवनविन प्रकल्प आणुन गरजुंना मदत करीत असतात .
डॉ शब्बीर यांनी सांगितले की जर तुम्हाला एकुण आले नाहि तर बोलताच येत नाही असे सांगुन अभिमन्युचे सुंदर उदारण देऊन रुग्णांच्या पालकांना समजावले , प्रो चेअरमन हुसेन भाई यांनी प्रस्तावीक केले सुत्रसंचलन राजेश माखीजा यांनी केले . शिबिरात वय १ ते १२ वर्ष पावेतोच्या ५६ बालकांना तपासणी करण्यात येऊन शस्त्रक्रियेसाठी नाशिक येथील सुसज्ज व अद्ययावत रुग्णालयात सुनियोजित वेळी पाठविण्यात येईल सदर शस्त्रक्रिया खाजगी रुग्णालयात किमान ८ ते १० लाख रु खर्चाची असुन शिबिरातील बालकांची तपासणी डॉ शब्बीर इंदौरवाला , युसुफ पंजाब ,सकीना नगरवाला ,राजेश अग्रवाल इ तज्ञांनी केली .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष चेतन सिसोदिया ,सचिव राजेश माखिजा,प्रो चेअरमन हुसेन विरदेलवाला ,नामदेव थोरात , डॉ दिपक श्राँफ ,राजेश भंडारी ,जवाहर केसवानी ,प्रविण महाजन ,आर .सी सी.अपंग राऊंड टाऊनच्या अध्यक्षा सौ संगीता बागल,वसंत बागल जगदीश चौधरी सर ,सुरेश मोरे ,रोटरी इनरव्हीलच्या अध्यक्षा मयुरा पारख सर इ सदस्य उपस्थित होते.




