‘त्यानं’ खुरीखुरी रिक्षाच ठेवली घराच्या छतावर

auto-rickshaw-on-home-terrest

बुलढाणा (प्रतिनिधी) – सध्या ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकांची धूम सुरु आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार नवनवीन फंडे वापरत आहेत. असाच एक अनोखा फंडा जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या सुटाळा बु. ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या एका उमेदवाराने आजमाविला आहे. निवडणूक चिन्ह ऑटोरिक्षा असल्यामुळे या उमेदवाराच्या मुलाने खराखुरा ऑटोरिक्षा चक्क घरावर नेऊन ठेवला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील सुटाळा बु. येथील गीताबाई रहाटे यांना ऑटोरिक्षा हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे गीताबाई यांच्या मुलाने त्यांच्या घरावर चक्क खराखुरा ऑटोच नेवून ठेवलाय. हा ऑटोरिक्षा छतावर ठेवण्यासाठी गीताबाईंच्या मुलाने चक्का क्रेनचा वापर केला आहे. एवढंच नाही तर या ऑटोरिक्षावर रोज रात्री ते नेत्रदीपक रोषणाई करतात. मतदारांचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हा फंडा वापरला आहे. नेत्रदीपक रोषणाई केल्यामुळे त्यांच्या घरासमोर रोज बघ्यांची गर्दी होते. गीताबाई तसेच त्यांच्या मुलाला नागरिकांकडून याबद्दल विचारले जात आहे.

ग्रामपंचायत-निवडणुक

दरम्यान, निवडणूक म्हटलं की उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे नुस्के हमखास वापरले जातात. वापरलेल्या नुस्क्यांमुळे यश पदरात पडतंच असं नाही. त्यामुळे खामगाव तालुक्यात छतावर ठेवलेला ऑटो पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत असले तरी गावाचा विकास करण्यासाठी उभी राहिल्याचा दावा गीताबाई करतात. त्या निवडणूक जिंकतील किंवा नाही हे आगामी काळात समजेलच. मात्र, छतावर ऑटोरिक्षा ठेवण्याच्या या अचाट कल्पनेची चर्चा मात्र महाराष्ट्रभर होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here