दारूच्या नशेत मुलाने केला ७५ वर्षीय आईवर बलात्कार

rape-on-mother

आग्रा (उत्तर प्रदेश) – येथे संतापजनक घटना घडली आहे. दारूच्या नशेत मुलानेच आपल्या 75 वर्षीय आईवर बलात्कार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे नशेत घरी आलेल्या आरोपीने आपल्या पत्नी आणि सूनेसमोरच आईवर अत्याचार केला. आरोपीच्या सूनेने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा येथील फतेहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सीकरी या गावात हा भयंकर प्रकार घडला आहे. 45 वर्षीय अमर सिंह हा पत्नी, मुलगा आणि सूनेसोबत राहत आहे. अमर सिंह रोज दारू पिऊन घरी येत असे. बुधवारी रात्री अमर सिंह याचा मुलगा घरात नव्हता. त्याचवेळी अमर सिंह हा दारू पिऊन घरी आला. तो खोलीत गेला आणि आईवर बलात्कार केला. आईने आरडाओरड केल्यानंतर अमर सिंहची पत्नी आणि सून मदतीसाठी धावून गेली. मात्र खोलीचा दरवाजा बंद असल्याने त्या काही करू शकल्या नाहीत.

लज्जास्पद प्रकारानंतर सूनेने लगेचच पोलिसांना फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात़डीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपी अमर सिंह याला ताब्यात घेतले. आरोपीची पत्नी आणि सून या दोघी पीडितेला घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचल्या. त्यांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याची रवानगी तुरुंगात केली आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here