निभोंरा येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा.

nimbhora-journalist

रावेर (प्रतिनिधी हमीद तडवी) – निभोंरा स्टेशन येथील कृषी विद्यालयात सकाळी 10-00 महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रावेर तालुका बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर मिंटीग महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रावेर तालुकाध्यक्ष श्री विलास ताठे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निंभोरा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री उनवणे, सावदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास इंगोले, सामाजिक कार्यकर्ते सुनिल कोंडे, यांची उपस्थिती होती.
सर्व प्रथम राष्ट्रमाता जिजाऊ, प्रथम महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून पत्रकार दिनानिमित्त बाळ जांभेकर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व मान्यवरांनी करून यांनी पुष्पहार अर्पण केले, तसेच भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात शिशू केअर युनिट मध्ये लागलेल्या आगीत 10 नवजात शिशूंचा दुदैवाने मृत्यू झाला, त्यांना सर्व पत्रकार बंधुंनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली, तसेच या बालकांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या या दुःखात सर्व पत्रकार मंडळी सहभागी आहोत ,व ईश्वर त्या कुटुंबातील सदस्यांना या संकटातून बाहेर पडण्यासाठी दैवी शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना सर्व पत्रकार बंधुंनी केली.

त्याचप्रमाणे श्री उनवणे साहेब यांचें स्वागत प्रमोद कोंडे यांनी केले तर श्री देविदास इंगोले साहेब यांचे स्वागत प्रा .दिलीप सोनवणे यांनी केले, सुनिल कोंडे यांचें स्वागत प्रदीप महाराज , तालुकाध्यक्ष विलास ताठे यांचें स्वागत दस्तगीर खाटीक यांनी केले. उपाध्यक्ष संतोष नवले यांचें स्वागत विनायक जहुरे, कार्याध्यक्ष योगेश सैतवाल यांचें स्वागत पिंजारी, सचिव दिलीप भारंबे यांचें स्वागत योगेश पाटील, तालुका संघटक प्रदीप महाराज यांचें स्वागत शेख, सह सचिव जगदिश चौधरी यांचे स्वागत तडवी यांनी केले. तर संजय पाटील, लक्ष्मण ठाकूर,दस्तगीर खाटीक भिमराव कोचुरे सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल महाजन यांनी सर्व संघटनेचे वतीने अभिनंदन केले,

रावेर तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विलास ताठे यांनी मनोगत व्यक्त केले, यांत त्यांनी पत्रकार दिनानिमित्त सखोल माहिती पर मार्गदर्शन केले. तसेच संघटना हि व्यक्ती पेक्षा मोठीं आहे, आपण सर्व म्हणजे संघटना आणि संघटना म्हणजे सदस्य आहेत, तसेच पत्रकार म्हणजे खरी परिस्थिती, सत्यता मांडणारा, समाज सुधारक, सेवाभावी सच्चा पण बिना पगारी सेवक म्हणून चोवीस तास कार्य करणारा समाज, कायदा, सुव्यवस्था आणि शासनाच्या मधला अनमोल ठेवा आहे, ह्यांची गरिमा खूप मोठी आहे, व अभिमान वाटावा अशी आहे, त्यासाठीच प्रत्येक पत्रकार बंधुंनी आदर्श निती मुल्ये पाळावीत अशी विनंती सर्व पत्रकार बांधवांना केली, यानंतर सुनिल कोंडे यांनी मनोगत व्यक्त केले नंतर श्री उनवणे साहेब व श्री देविदास इंगोले साहेब यांनीही सर्व पत्रकार बंधुंना पत्रकार दिनानिमित्त अभिनंदन पर हार्दिक शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले,

यावेळी उपाध्यक्ष संतोष नवले, कार्याध्यक्ष योगेश सैतवाल सचिव दिलीप भारंबे, तालुका संघटक प्रदीप महाराज, सहसचिव जगदिश चौधरी, सह अनेक रावेर तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप महाराज यांनी तर सुत्रसंचालन प्रा दिलीप सोनवणे करून प्रमोद कोंडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here