शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी; तहसीलदारांना निवेदन देवून शेतकऱ्यांची मागणी

farmer-of-shahada

नंदूरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – शहादा तालुक्यातील काथर्दे, वाघोदा, वैजाली या गावांमध्ये ऑगस्ट २०१९ मध्य अतिवृष्टी मध्ये कापूस, सोयाबीन या पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आणि पिकांचा पंचनामे करण्यात आले व नुकसान भरपाईची यादी जाहीर व्हायला चार महिने झाले तरी कुठल्याही प्रकारचा मोबदला शेतकरींना मिळालेला नाही. अशी माहिती काथर्दे येथील गुलझारसिंग गिरासे व गावातील नागरिकांनी दिली.

काथर्दे गावातील शेतकरी अजूनही नाराजी व्यक्त करत आहेत. व त्या संदर्भात चौकशी करून वंचित शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी शहादा येथील तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना काथर्दे येथील सरपंच गोरख भील, उपसरपंच गुलझारसिंग गिरासे, पोलीस पाटील कोमलसिंग गिरासे, गोपाल गिरासे, नरेंद्र गिरासे व गावातील शेतकरी उपस्थित झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here