वर्धा (जिल्हा प्रतिनिधी मनोज बाचले) – दिनांक 3 जानेवारी 2021 रोजी भारतीयांची क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवन चरित्रावर ऑनलाइन प्रश्नमंजुषाचे आयोजन करण्यात आले.
त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली..गेले की दोन ते तीन दिवसात स्पर्धेमध्ये जवळपास महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातएकूण विद्यार्थी 1522 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला. स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व स्पर्धकांना पण त्यांच्या मेलवर वितरित करण्यात आले.
कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी सुद्धा शाळेत साजरे होणारे महापुरुषाच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त यशवंत विद्यालय, वायगाव निपाणी येथील नेहमी अशा लिंक च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानावर भर पडावी यासाठी लिंक तयार करतात विद्यार्थी आवडीने त्यामध्ये सहभागी घेतात.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्याचा प्रसार व त्यांच्या माध्यमातून करण्याचा यशस्वी प्रयत्न झाला. यासाठी लिंक तयार करण्यापासून ते स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी श्री. मनोज रामटेके सर यांनी कठोर परिश्रम घेतले. तसेच मार्गदर्शक म्हणून शाळेचे प्रभारी प्राचार्य श्री. एस.जे. देशमुख यांचे मार्गदर्शन मोलाचे लाभले. तसेच शाळेचे शिक्षक वृंद व प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा सहकार्य केले.




