जालौन (उत्तर प्रदेश) – बाल लैंगिक शोषण प्रकरणात बडतर्फ भारतीय जनता पक्षाच्या नेत्याकडून लॅपटॉप, डीव्हीडी आणि हार्ड डिस्कमधून धक्कादायक व्हिडीओ समोर आले आहेत.
पोलिसांना हा सर्व प्रकार पाहून धक्काच बसला. ते याप्रकरणात पुढील तपास करीत आहेत. कोंच पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक इम्रान खान यांनी गुरुवारी सांगितलं की, कोंच भागातील भगत सिंह नगरमधून रामबिहारी राठोड (65) यांना बाल लैंगिक शोषण प्रकरणात अटक करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या घरातून लॅपटॉप आणि हार्ड डिस्कमध्ये 15 ते 20 अश्लील व्हिडीओ सापडले आहेत. या व्हिडीओमध्ये आरोपी लहान मुलांसोबत अत्यंत घृणास्पद कृत्य करीत असल्याचे दिसत आहे.
त्यांनी सांगितलं की, पोलिसांच्या सायबर क्राईमच्या टीमकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात आहे. एसएचओ यांनी सांगितलं की, राठोड सुरुवातील पैशांचं आमिष दाखवून लहान लहान मुलांना आपल्या जाळ्यात खेचत असतं आणि त्यानंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करुन व्हिडीओ तयार करुन ब्लॅकमेल करीत होते. तो लहान लहान मुलांना धमकी देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता. राठोड याला बुधवारी तुरुंगात पाठविण्यात आलं असून पोलीस या प्रकरणात अधिक तपास करीत आहे.







