दोन लाखांचा मुद्देमाल जप्त; तोफखाना पोलीस ठाण्यात 14 जणांवर गुन्हा
नगर (प्रतिनिधी) – नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्या विशेष पथकाने नगर शहरातील तोफखाना परिसरात सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकला. या छाप्यादरम्यान 14 जुगाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून 35 हजार 500 रुपयांची रक्कम, एक लाख 60 हजार रुपये किमतीच्या दुचाक्या व 750 रुपयांचे जुगार साहित्य, असा एक लाख 96 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पथकातील पोलीस शिपाई उमाकांत खापरे यांच्या फिर्यादीवरून 14 जणांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण प्रभाकर पानपाटील (रा. भिंगार), मोहित दिलीप नगरकर (रा. रामचंद्र खुंट), अक्षय सुभाष पवार (रा. बालिकाश्रम रोड), अमित बाळासाहेब चिंतामणी (रा. सर्जेपुरा), श्यामसुंदर बारकू रोकडे (रा. तोफखाना), शेख शाहनवाज लियाकत (रा. मुकुंदनगर), अनिल हरिभाऊ जाधव (रा. माळीवाडा), बाळू लक्ष्मण कुंटला (रा. शिवाजीनगर), रियान आलम शेख (रा. बुऱ्हाणनगर, ता. नगर), जिशान राजू इनामदार (रा. फकीरवाडा), सईद ताहीर बेग (रा. केळगाव, ता. नगर), मोबिन मुश्ताक कुरेशी (रा. बेपारी मोहल्ला), जमील अब्दुल इब्राहिम, इरफान युसूफ पठाण (दोघे रा. कोटला) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
जुगार चालक राहुल बिज्जा (रा. तोफखाना) पसार झाला आहे.तोफखाना परिसरात राहुल बिज्जा याच्या मालकीच्या जागेत जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन जाधव यांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीवरून जाधव यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, सहायक फौजदार राजेंद्र सोनवणे, पोलीस कर्मचारी नितीन सपकाळे, विश्वास हजारे, जयेश पाटील, सुरेश टोंगारे यांच्या पथकाने दोन पंचांसमक्ष जुगारावर छापा टाकून ही कारवाई केली.







