हिंजवडी भागात ऑनलाईन माध्यमातून सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

online-sex-racket

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – पुण्यातील हिंजवडी भागात ऑनलाईन माध्यमातून सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल केला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे तर महाराष्ट्र, आसाम आणि बिहार राज्यातील चार तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

जीवन संतोष ताथवडे (वय 23, रा. चिंचवडेनगर, चिंचवड. मूळ रा. पिंपळवाडी, ता. खेड), रामदास सोपानराव साळुंखे (वय 62, रा. येरवडा, पुणे), अनिकेत चंद्रकांत भालेराव (वय 26, रा. शिंदेवस्ती रोड, गणेशनगर, रावेत) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह केशव, राहुल, दीपक उर्फ बॉबी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अटक केलेल्या तीन आरोपींकडून रिक्षा, दोन मोबाईल फोन असा एकूण 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासात भूमकर वस्ती येथील आदिती एक्झिक्युटिव्ह ओयो या हॉटेलचा वेश्या व्यवसायासाठी वापर झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी परिसरात ऑनलाईन माध्यमातून वेश्या व्यवसायासाठी ग्राहकांचा शोध, आर्थिक देवाण घेवाण केली जात असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता ऑनलाईन वेबसाईट आणि मोबाईल क्रमांक आढळले. ऑनलाईन माध्यमातून बनावट गिहाईकामार्फत पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला.

त्यात पोलिसांनी महाराष्ट्र, आसाम आणि बिहार राज्यातील चार तरुणींची सुटका केली. सुटका केलेल्या तरुणींची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. आरोपींनी त्यांचे मोबाईल क्रमांक वेबसाईट मध्ये दिले होते. ग्राहकांनी वेबसाईटवरून नंबर घेऊन आरोपींशी संपर्क केल्यास ग्राहकांच्या मोबाईल फोनवर फोटो पाठवले जात. ग्राहकांना पसंत पडलेल्या मुलींना ग्राहकाने सांगितलेल्या ठिकाणी पाठवून दिले जात. यासाठी आठ हजार ते 20 हजार रुपयांपर्यंत पैसे घेतले जात होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here