नवजात बालकांची विक्री करणाऱ्या डॉक्टर व नर्सवर मुंबई पोलिसांची कारवाई

mumbai-police

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – नवजात चिमुकल्यांची विक्री करणाऱ्या टोळीवर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली. पोलिसांनी एका टोळीला अटक केली आहे. क्राईम ब्रांच युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे नवजात मुलाची विक्री करणाऱ्या या टोळीमध्ये डॉक्टर, नर्स, लॅब टेक्निशियन यांचा देखील समावेश आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लहान मुले गायब होण्याच्या घटना वाढल्या होत्या. तशा वारंवार तक्रारी येत असल्यानं मुंबई क्राईम ब्रांचचे अधिकारी या प्रकरणांचा छडा लावत होते. काही दिवसांपासून आरोपींच्या शोधात असलेल्या पोलिसांना अखेर यश आलं. पोलिसांनी एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी लहान मुलांची, नवजात बालकांची खरेदी-विक्री करत असल्याचे उघड झाले आहे.

मुंबई क्राईम ब्रांचच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांना मुंबईत लहान मुलांची खरेदी विक्री करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला होता. वांद्रे खेरवाडी येथील ज्ञानेश्वर नगरातील महिलांनी आपली मुलं एजंट मार्फत विकल्याच समजताच त्या महिलांना पोलिसानी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर ज्या एजंटनी ही मुलं विकली आहेत, त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. तपासाची सुरू असतानाच लहान मुलांची विक्री करणाऱ्या टोळीपर्यंत पोलीस जाऊन पोहोचले. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात एकूण नऊ जणांना अटक केली आहे. या टोळीत एक डॉक्टर, एक नर्स, एक लॅब टेक्निशियन आणि सहा एजंट्सचा समावेश होता. या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या टोळीतील सहा एजंटमध्ये पाच महिला आहेत. हे रॅकेट ज्या महिलांना मुलं होणार आहे, मात्र त्या मुलाचं पालन पोषण करण्यास महिला सक्षम नाहीत. अशा महिलांचा शोध घ्यायचं. त्यांनी बाळाला जन्म दिला की, या नवजात मुलांची खरेदी विक्री व्हायची. आतापर्यंत या टोळीने तीन मुलांच्या खरेदी विक्रीचा व्यवहार केला असून, तो पोलीस तपासात उघडकीस झाला आहे. अडीच ते साडे तीन लाख रुपयांना मुलं विकली जात होती. गरिबी आणि पैशांची चणचण या कारणांमुळे या नवजात बालकांची खरेदी-विक्री सुरु होती, असं पोलीस तपासातून समोर आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here