गावागावात तरूण, महिला एकत्र येत, कमिटी स्थापन करण्याचे आवाहन…
दोंडाईचा (विशेष प्रतिनिधी) – आज येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार अनिल आण्णा गोटे यांच्या अध्यक्षतेखाली शिंदखेडा तालुक्यात फोफावलेला दहशतवाद व झालेला अन्याय, खोट्या केसेसचे भय मुळासकट उपटून काढत.जनतेला भयमुक्त जीवन जगता यावे.म्हणून दहशतवाद मुक्त शिंदखेडा हया अभियानाची सुरुवात करण्याचा पाश्वभुमीवर तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक बोलविण्यात आली होती.बैठकीत अनिल गोटे यांनी शिंदखेडा तालुक्यात फोफावलेला दहशतवाद नष्ट करण्यासाठी आपण येत्या २६ जानेवारीपासून १७ फेब्रुवारीपर्यंत असे एकुण तेवीस दिवस तालुक्यात दिवसरात्र जनतेच्या भेटी घेवून, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडून,त्यांना भयमुक्त जीनव जगण्याचे स्वातंत्र्य दिल्यावरच घरी जावू,असे सांगून जनतेने गावागावात कमिट्या स्थापन करण्याचे आवाहन शेवटी त्यांनी केले.
व्यापारी भवन येथे बोलवलेल्या बैठकीत राष्ट्रवादी पक्षाचे धुळे जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे,नंदुरबार जिल्हाध्यक्ष अभिजीत पाटील, माजी नगराध्यक्ष डाँ. रवींद्र देशमुख, एन.सी.पाटील, शहराध्यक्ष अँड.एकनाथ भावसार, ज्ञानोपासक शिक्षण मंडळीचे संचालक अमितदादा पाटील, माजी नगराध्यक्ष गुलाब सोनवणे, गिरधारीकाका रामराख्या, ललीत वारूळे, केतन भदाणे, डाँ.कैलास ठाकरे, अँड. रवींद्र मोरे,अँड.मुन्ना मराठे,माजी नगरसेवक दिलीप पाटील, असलम शहा, भुपेन्द्र धनगर, नाजीम शेख, रामभाऊ माणीक, विठ्ठलसिंग गिरासे, विरेन्द्र गोसावी, मधुकर रामोळे, छोटू सांगळे, घनश्याम राजपूत, वंसत कोळी, जब्बार बागवान, महेंद्र जैन, जितेंद्र चव्हाण, प्रतिक देशमुख, नंदू सोनवणे, अभय पाटील ,रईस बागवान, लाला बागवान, सचीन सोनवणे, जितेंद्र तिरमले, दिलीप माणीक यासह तालुक्यातील बरीचशी ग्रामपंचायत सदस्यासह तोलामोलाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व अनिल आण्णा गोटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मी ह्या अगोदर तळोदा तालुक्यातील चौधरी, शिरपूर तालुक्यातील पाटील यांची दादागिरी मोडीत काढली आहे.अन्याय, अत्याचारविरूद्ध लढण्याचे बाळकडू वडील स्वातंत्र्य सैनिक असल्याने घरूनच मिळाले आहे. शिंदखेडा तालुक्यातही मागील पंधरा वर्षांपासून दादागिरी, अन्याय, खोट्या केसेस करून दहशतवाद फोफावला आहे. भष्ट्राचार, अन्याय, खोट्या केसेस विरोधात कोणी बोलला की,त्याच्यांवर खोटा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकायचे.गावागावांमध्ये भानगढी लावायच्या, शासनाने तालुका, परिसरात कोणताही उद्योग, प्रोजेक्ट आणायचा विचार केला की,त्याठिकाणी खोटेनाटे परिस्थिती, कागदपत्रे तयार करून शासनाची करोडोने लुट करायची आणि ह्या लुटीच्या पैशातुन निवडणुकीत लोकांवर पैसा उधळायचा,सत्ता काबीज करायची,कोणी आपल्याकडे,आपल्या भष्ट्राचाराकडे बोट दाखवला की,त्याला हाबले-काबले मार्फत दहशत माजवत अद्दल घडवायची,म्हणून ह्या सर्व दहशतवाद, दादागिरीला शिंदखेडा तालुक्यातील जनता त्रासलेली आहे. म्हणून अशा दहशतीतुन माजलेल्याचा माज जिरवण्यासाठी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून “दहशत मुक्त शिंदखेडा तालुका” अभियानाला सुरुवात करत असुन, १७ फेब्रुवारीपर्यंत तालुक्यातील प्रत्येक गावात दिवसरात्र भेट देत,तेथे राहून,लोकांचे प्रश्न समजून, त्यांची भिती दुर करून,गावागावात तरूण, पुरूष व महिला यांची शरदचंद्रजी पवार समिती ह्या नावाने कमिटी तयार करण्यात येईल. तो पर्यंत मी व माझे सहकारी एकही दिवस घरी जाणार नाही व १७ फेब्रुवारीला दोंडाईचा येथे पक्षाचे सर्वोसर्वा लोकनेते शरदचंद्रजी पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जयंतआबा पाटील यांच्या उपस्थितीत अभियानाचा समारोप करण्यात येणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आजपासूनच कामाला लागायच्या सुचना त्यांनी केल्या. तसेच अनिल आण्णा गोटे यांनी शिंदखेडा मतदार संघातील विद्धमान आमदारांच्या अकरा भष्ट्राचाराच्या फाईली माझ्याकडे आल्या असुन, त्या विषयांवरही प्रकाशझोत टाकला.
यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, एन.सी.आबा पाटील, डाँ. कैलास ठाकरे आदींचे भाषणे झाली. बैठकीचे सुत्रसंचालन मालपुरचे माजी संरपच विरेन्द्र गोसावी यांनी तर आभार अमित पाटील यांनी मानले.




