बैतूल (मध्यप्रदेश) – देशात महिलांविरोधी अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. तसेच अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याच्या बाबतीत तर नराधमांनी क्रूरतेचा कळस गाठला आहे.एका नराधमाने 13 वर्षाच्या मुलीच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले आहेत. आरोपीने या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला जिवंत पुरलं आहे. या धक्कादायक प्रकरणात या नराधमाला अटक झाली असून पीडित मुलीवर उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती खूप नाजूक असल्याचं म्हटलं जात आहे.
ही घटना मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील आहे. या प्रकरणात 13 वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर आरोपीने तिला जिवंत पुरलं आहे. आपली मुलगी गायब असल्याचं लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी तिची शोधाशोध केली. तेव्हा शेतीतील एका नाल्यातून कण्हण्याचा आवाज ऐकू आला. त्यानंतर कुटुंबियांनी नीट पाहल्यानंतर मुलगी अर्धमेल्या अवस्थेत आढळली. आरोपीने तिच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले होते. पीडित मुलीच्या सर्व शरीरावर जखमांचे अनेक व्रण होते. त्यानंतर तिला अशाच गंभीर अवस्थेतच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. या गुन्ह्यातील आरोपी सुशील वर्माला पोलिसांनी अटक केली आहे.







