नेताजी सुभाषचंद्र बोस यांची काँग्रेसने हत्या केल्याचे भाजप खासदार साक्षी महाराज यांचे खळबळजनक वक्तव्य

sakshi-maharaj

उन्नाव (उत्तरप्रदेश) – नेताजी सुभाषचंद्र बोस यांची हत्या काँग्रेसवाल्यांनी केली असल्याचा खळबळजनक आरोप भाजप खासदार साक्षी महाराज यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपावरून नवा वाद निर्माण होऊ शकतो. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित उन्नाव येथील एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

‘नेताजी सुभाष चंद्र बोस हे फार लोकप्रिय होते. त्यांच्या लोकप्रियतेपुढे पंडीत नेहरू व महात्मा गांधी टिकूच शकत नव्हते. त्यामुळे काँग्रेसनेच त्यांची हत्या घडवून आणली आहे’, असे खळबळजनक वक्तव्य साक्षी महाराज यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here