शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – सातबारा उताऱ्यावर त्यांचे वडिलांचे लागलेल्या नावात दुरुस्ती होण्यासाठी तलाठी जयसिंग पावरा यांना १५०० रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे वडिलांचे डोगेगाव शिवार तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथे गट क्रमांक 101/2 ही शेतजमीन आहे. सदर जमिनीचे सातबारा उताऱ्यावर त्यांचे वडिलांचे लागलेल्या नावात दुरुस्ती होण्यासाठी तलाठी जयसिंग पावरा यांनी नमूद काम करण्यासाठी तक्रार यांच्याकडे 20/1/2021 रोजी 1500 रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने माहिती दिल्यावरून लाचलुचपत विभागाने सापळा लावतआज दिनांक 27/1/2021 रोजी मंडळ अधिकारी कार्यालय, खांडबारा ता. नवापूर येथे पंच व साक्षीदार यांच्यासमक्ष लाच स्वीकारतांना जयसिंग पावरा यांना ताब्यात घेतले आहे.
याच लोकसेवक तलाठी यास नंदुरबार युनिटने दिनांक 12/3/2018 रोजी लाच घेताना नंदुरबार तलाठी कार्यालयात पकडले होते. कर्तव्यावर हजर झाल्यानंतर त्यानें त्याचे लाच घेण्याचे उद्योग पुन्हा सुरू केले. लाच लुचपत विभाग नंदुरबार यांना याबाबत तक्रार प्राप्त होताच त्यास पुन्हा लाच घेताना पकडण्यात आले आहे.
ही कारवाई सापळा अधिकारी शिरीष जाधव, पोलीस उप अधीक्षक नंदुरबार, जयपाल अहिररराव पोलीस निरीक्षक ला.प्र.वि. नंदुरबार, HC महाजन, HC गुमाणे, PN दीपक चित्ते , मनोजअहिरे, संदीप नावडेकर, अमोल मराठे, WPN ज्योती पाटील, चालक HC मनोहर बोरसे यांनी केली.







